Mumbai Rain: मुंबईत मुसळधार, फडणवीसांकडून रेल्वे, एनडीआरएफ, बीएमसी अधिकाऱ्यांची बैठक, 4 मोठ्या सुचना

मुसळधार पावासमुळे मुंबईत कुठेही पाणी साचू नये. रेल्वे सेवेवर पावसाचा कोणताही परिणाम होऊ नये तसेच कोकण परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. मुंबईतील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने फडणवीस यांनी संबधीत विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार, फडणवीसांकडून रेल्वे, एनडीआरएफ, बीएमसी अधिकाऱ्यांची बैठक, 4 मोठ्या सुचना
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:12 PM

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत(rains in Mumbai) धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra) यांनी मुंबईच्या आपत्कालून स्थितीचा आढावा घेतला. रेल्वे(Railway), एनडीआरएफ(NDRF), बीएमसी(BMC) अधिकाऱ्यांसह फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर उप मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्याना चार मोठ्या सूचना केल्या आहेत.

मुसळधार पावासमुळे मुंबईत कुठेही पाणी साचू नये. रेल्वे सेवेवर पावसाचा कोणताही परिणाम होऊ नये तसेच कोकण परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. मुंबईतील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने फडणवीस यांनी संबधीत विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ट्रेन बंद पडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

मुंबईच्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वप्रथम रेल्वे सेवेला बसतो. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ट्रेन बंद पडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत या विषयी चर्चा झाली

कोकणात दरडी कोसळण्याचा धोका

मुसधार पावसामुळे कोकणात दरडी कोसळण्याचा धोका असतो. या अनुषंगाने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याविषयी देखील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगीतले. दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले.

पाऊस किती पडेल हे आपल्या हातात नाही

कोणती आपत्ती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. अथवा किती पाऊस पडेल हे आपल्या हातात नाही. यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. एखाद्या आपत्कालीन स्थितीशी सामना करता येईल तसेच तत्काळ मदत देता येईल यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना आपत्कालीन विभागासहसर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर

मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पावसात इमारतीव कोसळण्याच्या घटना घडतात. BMC धोकादायक इमारतींना सूचना देऊन त्यांनतर पुढची कारवाई करत नाही. यामुळे जिथे इमारत पडेल तिथे जर आधी नोटीस दिली नसेल तर संबधीत वार्ड ऑफीसरवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचे फडणवीस म्हणाले. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना BMC अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.