पवार म्हणाले, मावळनंतर राष्ट्रवादी जिंकली, आता फडणवीसांनी जालियनवालाचा आदेशकर्ता दाखवला!

| Updated on: Oct 13, 2021 | 5:21 PM

भाजप कार्यकर्त्यांनी भडकवल्यानेच मावळमध्ये हिंसाचार भडकला. जनतेच्या हे लक्षात आल्यानंतर मावळमध्ये आमचा उमेदवार प्रचंड मतांनी जिंकला, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. (devendra fadnavis reply to ncp leader sharad pawar over his allegations)

पवार म्हणाले, मावळनंतर राष्ट्रवादी जिंकली, आता फडणवीसांनी जालियनवालाचा आदेशकर्ता दाखवला!
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: भाजप कार्यकर्त्यांनी भडकवल्यानेच मावळमध्ये हिंसाचार भडकला. जनतेच्या हे लक्षात आल्यानंतर मावळमध्ये आमचा उमेदवार प्रचंड मतांनी जिंकला, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. जालियनवालामध्ये गोळीबार करायला गव्हर्नर गेले नव्हते. पोलिसांनीच केला होता. पण आदेश गव्हर्नरचा होता. तसेच मावळमध्ये घडलं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला. शरद पवारांची पीसी कशावर होती हेच मला कळलं नाही. कारण ते वेगवेगळ्या विषयावर बोलले. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता. जालियनवाला बागमध्ये गोळीबार करायला त्यावेळचे गव्हर्नर गेले नव्हते. तर पोलिसांनीच गोळीबार केला होता. त्यामागे गव्हर्नरचे आदेश होते. त्यामुळे मावळचा गोळीबारही जालियनवााल बाग सारखा होता. तिथे राज्यकर्त्यांना जायची गरज नव्हती, असं फडणवीस म्हणाले.

स्टेट स्पॉन्सर्ड बंद

लखीमपूरमध्ये हिंसा होते आणि इकडे तुम्ही बंदच्या नावाखाली धुडगूस घालता. बंदमध्ये माल पळवून नेला जातो हे कोणतं राज्य आहे? शिवसेना बंदमध्ये सामिल असेल तर काय होतं हे पवारांनीच सांगितलं ही समाधानाची गोष्ट आहे. बंदचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे बंद किती शांततेत होता हे दिसून येतं. दुकानदारांचा माल आंदोलक घेऊन पळत होते. पोलीस बघत होते. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद होता, अशी टीकाही त्यांनी केली.

उच्च न्यायालयावर विश्वास आहे की नाही?

अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. उच्च न्यायालयाने सीबीआयची चोौकशीचे आदेश दिले. या सरकारने सीबीआयला प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे बँकातील अनेक प्रकरणे धुळखात पडलेली आहेत. मात्र, देशमुख प्रकरणात उच्च न्यायालयानेच सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयावर पवारांचा विश्वास आहे की नाही?, असा सवाल त्यांनी केला.

पवार कधीच पाच वर्ष मुख्यमंत्री नव्हते

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानाची पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. पवार मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पण कधीच ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. राहिले असते तर त्यांनी चांगलं काम केलं असतं. कधी दोन वर्ष, कधी तीन वर्ष त्यांनी काम केलं. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना राहता आलं नाही. पण मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. त्यामुळेच सत्ताधारी अस्वस्थ आहेत, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: देशमुखांपासून फडणवीसांपर्यंत आणि मावळपासून लखीमपूरपर्यंत; शरद पवारांची 7 मोठी विधाने

‘अजुनी यौवनात मी’, खासदार संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला

नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचे तिरके बाण

(devendra fadnavis reply to ncp leader sharad pawar over his allegations)