नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचे तिरके बाण

जरंडेश्वर घेतलेल्या कंपनीत एक संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील आहेत, आता तुम्ही सांगा बहिणींच्या घरी का धाडी पडल्या? बहिणीच्या नावाने बेनामी संपत्ती करणं हे दुर्दैवी आहे" अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.

नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचे तिरके बाण
Ajit Pawar Kirit Somaiyya


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते. यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला. पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“27 हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना काढून घेतला. मी तेव्हापासून विचारतोय कारखान्याचा मालक कोण?” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी कागदपत्रं सादर केली. “उच्च न्यायालयाने जरंडेश्वर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही” असं सोमय्या म्हणाले.

“जरंडेश्वरमध्ये अजित पवारांच्या बहिणीचे पती संचालक”

“धाडीनंतर अजित पवारांनी भावुक स्टेस्टमेंट केलं की माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या. जरंडेश्वर घेतलेल्या कंपनीत एक संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील आहेत, आता तुम्ही सांगा बहिणींच्या घरी का धाडी पडल्या? बहिणीच्या नावाने बेनामी संपत्ती करणं हे दुर्दैवी आहे” अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.

“नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली तर…”

“जरंडेश्वरचे 90 टक्के शेअर्स 27 लेअर नंतर शेवटी स्पार्किंग सोईलकडे आहेत आणि त्याचे मालक आहे सुनेत्रा अजित पवार आणि अजित अनंतराव पवार आहेत. या कंपन्यांच्या गुंतवणुकीत 57 नामी-बेनामी कंपन्या आहेत. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते, यातला सिझन 1 हा अजित पवार असेल” असा टोलाही सोमय्यांनी लगावला.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरु, त्यांना गुरू म्हणतात. मंत्र्यांच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, मात्र पदाचा फायदा घेऊन स्वतःच्या संस्थांना फायदा पोहोचवत राहणं गैर असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI