काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी तीन दिवस दिल्लीत होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव घोषित व्हावा ही अपेक्षा होती. परंतु ते तीन दिवस दिल्लीत बसले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटोही जाहीर होऊ दिला नाही.

काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे
Image Credit source: ANI
Jitendra Zavar | Updated on: Sep 06, 2024 | 1:27 PM

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन सर्व काही आलबेल आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याची घाई झाली आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांना दुजोरा मिळत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उद्धर ठाकरे यांनी आताच्या आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा? मी पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु त्यावेळीही काँग्रेस अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दखल घेतली गेली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत जाऊन आले. त्या भेटीतही त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत काँग्रेस नेतृत्वाने काहीच सांगितले नाही. हाच प्रश्न ‘टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्ह’मध्ये भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यांनी दोन्ही पक्षांचे उद्धव ठाकरे यांना समर्थन नसल्याचे म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी तीन दिवस दिल्लीत होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव घोषित व्हावा ही अपेक्षा होती. परंतु ते तीन दिवस दिल्लीत बसले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटोही जाहीर होऊ दिला नाही. तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाबाबत काही झाले नाही. म्हणजेच काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली.तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही हे जाहीर केले. नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याची री ओढली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मविआच्या मनात नाही, हे निश्चित आहे.

मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

मराठा आरक्षणाची लढाई १९८० पासून सुरू झाली. १९८२ साली अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मिळालं नाही. म्हणून स्वता:ला गोळी मारून घेतली. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. मुख्यमंत्री असेपर्यंत आरक्षण टिकलं. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आरक्षण गेलं. शिंदेंचं सरकार आलं. आरक्षण दिलं. आम्ही सारथी स्थापन केली. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. एक लाख मुलं उद्योजक झाले. आज आयपीएस वगैरे झाले. ते सारथीमुळे झालं. या गोष्टी एकनाथ शिंदे यांनी पुढे नेल्या.

सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. मी आणि अजितदादा सरकारमध्ये आहे. जरांगे फक्त माझं नाव घेतात. माझ्यामुळे आरक्षण अडलं असं ते म्हणतात. ते ज्यावर सही करतील ते फायनल असतं. मुख्यमंत्र्यांना मराठा समाजासाठी निर्णय घ्यायचा आहे. पण ते माझ्यामुळे अडलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी राजकीय संन्यास घेऊन असं मी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. देवेंद्र मदत करतात म्हणून सांगितलं. तरीही मला एकट्यालाच टार्गेट केलं जातं. जरांगे फक्त मला टार्गेट करतात. महाविकास आघाडी मला टार्गेट करतात. यात कनेक्शन काय आहे.

Follow Us