Navneet Rana | राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा, खार येथील फ्लॅटसंदर्भात एक महिन्याची मुदतवाढ, मुंबई मनपाला कारवाई न करण्याचे आदेश

Navneet Rana | राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा, खार येथील फ्लॅटसंदर्भात एक महिन्याची मुदतवाढ, मुंबई मनपाला कारवाई न करण्याचे आदेश
राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा
Image Credit source: t v 9

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा याचे मुंबईतील खार येथील निवासस्थानाचे बांधकाम अनधिकृत आहे. असे सांगत मनपाने दोनदा नोटीस बजावली. पंधरा दिवसांत राणा दाम्पत्यानं बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला. याविरोधात राणा दाम्पत्य कोर्टात गेले. कोर्टानं राणा दाम्पत्यांना दिलासा दिला.

रमेश शर्मा

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 25, 2022 | 1:39 PM

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana) यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. खार येथील फ्लॅटच्या संदर्भात न्यायालयाकडून अर्ज करण्यास 1 महिन्याची मुदत देण्यात आली. पुढील आदेशापर्यंत मुंबई महानगरपालिकेला कारवाई न करण्याचे कोर्टानं आदेश (court orders) दिले. त्यामुळं राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या घराच्या बांधकामाची मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) पाहणी केली. तेथील बांधकाम अनधिकृत असल्याचा आणि बांधकामात बदल केले असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. हे बांधकाम का पाडण्यात येऊ नये, असा ठपका मुंबई मनपाने ठेवला.

कारवाई न करण्याचे आदेश

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा याचे मुंबईतील खार येथील निवासस्थानाचे बांधकाम अनधिकृत आहे. असे सांगत मनपाने दोनदा नोटीस बजावली. पंधरा दिवसांत राणा दाम्पत्यानं बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला. याविरोधात राणा दाम्पत्य कोर्टात गेले. कोर्टानं राणा दाम्पत्यांना दिलासा दिला. खार येथील फ्लॅटच्या संदर्भात न्यायालयाकडून अर्ज करण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली. पुढील आदेशापर्यंत मुंबई मनपाला कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा विदर्भात

जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांना राणा दाम्पत्य विदर्भाचा दौरा करणार आहेत. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे 28 मे रोजी 12:45 वाजता नागपूरला येणार आहेत. नागपुरात आल्यानंतर ते राम मंदिरात हनुमान चालिसा म्हणतील. तसेच हनुमान आरती व महापूजा करतील. त्यानंतर ते अमरावतीसाठी रवाना होतील. विदर्भात ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

राणा दाम्पत्य-राष्ट्रवादीचे एकावेळी हनुमान चालिसा पठण

28 मे रोजी नागपुरात खा. नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे. खा. नवनीत राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस नागपुरात राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन होणार आहे. नवनीत राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचं रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादीचं महागाईविरोधात आंदोलन होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार महागाईचं संकट जावं म्हणून हनुमान चालिसा पठण करणार आहेत. एकाच मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें