Nagpur OCW | नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादीचं आंदोलन; मटके फोडत मनपा प्रशासनाचा निषेध; अमरावतीत आज पाणीबाणी

नागपुरात ओसीडब्ल्यू पाणीपुरवठा करते. एकीकडं पाण्याची कमतरता नसल्याचं सांगितलं जातं. तर काही भागात मात्र, पाण्याचा पुरवठा होत नाही. काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होता. त्यामुळं नागरिक संतप्त झालं. मनपा प्रशासक पाण्याचा पुरेसा पुरवठा करा, असे आदेश देतात. पण, ओसीडब्ल्यू पाणीवाटपात दुजाभाव करते, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय.

Nagpur OCW | नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादीचं आंदोलन; मटके फोडत मनपा प्रशासनाचा निषेध; अमरावतीत आज पाणीबाणी
नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादीचं आंदोलनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:13 PM

नागपूर : नागपुरात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने मटकाफोड आंदोलन ( Andolan) केलं. नागपुरात पुरेसं पाणी मिळावं. गेल्या काही वर्षांत पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. नागपुरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्यू कंपनी विरोधात यावेळी राष्ट्रवादीने घोषणाबाजी केलीय. दत्तात्रयनगर (Dattatryanagar) पाण्याच्या टाकीजवळ मटके फोडत राष्ट्रवादीने ओसीडब्यू आणि मनपा प्रशासनाचा (Administration) निषेध केला. काही भागात पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. मटके रिकामेच राहतात. त्यामुळं राष्ट्रवादीच्या वतीनं मटके फोड आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ओसीडब्ल्यू विरोधात घोषणाबाजी

नागपुरात ओसीडब्ल्यू पाणीपुरवठा करते. एकीकडं पाण्याची कमतरता नसल्याचं सांगितलं जातं. तर काही भागात मात्र, पाण्याचा पुरवठा होत नाही. काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होता. त्यामुळं नागरिक संतप्त झालं. मनपा प्रशासक पाण्याचा पुरेसा पुरवठा करा, असे आदेश देतात. पण, ओसीडब्ल्यू पाणीवाटपात दुजाभाव करते, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळंच ओसीडब्ल्यू विरोधात दत्तात्र्यनगर पाण्याच्या टाकीसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मटकेफोड आंदोल करत ओसीडब्ल्यूचा निषेध केला.

आज अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद

पाणी पुरवठा योजनेच्या सिंभोरा हेडवर्क्स येथे महावितरण सिंभोरा विद्यूत फीडरचे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या नियोजित कामामुळे आज सकाळी 11 ते 5 यावेळात म्हणजे 6 तास अमरावती व बडनेरा या दोन्ही शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अगोदरच दिवसाआड पाणीपुरवठा व पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांना दुरुस्तीच्या कामाचा फटका बसणार आहे. आज नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मजीप्राचे वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येऊ नये. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी आज कामे केली जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.