Chandrapur Murder | चंद्रपुरात पहाटे युवकाचा खून, धारधार शस्त्राने उडविले; एक संशयित ताब्यात

Chandrapur Murder | चंद्रपुरात पहाटे युवकाचा खून, धारधार शस्त्राने उडविले; एक संशयित ताब्यात
चंद्रपुरात पहाटे युवकाचा खून
Image Credit source: t v 9

ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. दोन संशयितांनी वादातून एकाला भोसकले. यात धर्मीवरचा मृतदेह सकाळी अष्टभूजा परिसरात सापडला. धारदार शस्त्रानं धर्मीवीरच्या शरीरावर मारल्याच्या खुणा आहेत. आपसी वादातून हा खून झाल्याचं सांगितलं जातं.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 25, 2022 | 11:34 AM

चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसर हत्येच्या घटनेने थरारला. अष्टभुजा वॉर्डातील (Ashtabhuja Ward) धर्मवीर यादव (Dharmaveer Yadav) उर्फ डबल्या (वय 20) असं मृतकाचं नाव आहे. डबल्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. सकाळी मृतदेह आढळल्यावर आला पोलीस तपासाला वेग आला. श्वानपथकाच्या मदतीने अज्ञात आरोपींचा तपास सुरू आहे. आरोपी दोन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे घटनास्थळी पुरावे शोध अभियान सुरू झालंय. रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police) एका संशयिताला ताब्यात घेतले. पहाटे तीनच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

असा घडला थरार

ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. दोन संशयितांनी वादातून एकाला भोसकले. यात धर्मीवरचा मृतदेह सकाळी अष्टभूजा परिसरात सापडला. धारदार शस्त्रानं धर्मीवीरच्या शरीरावर मारल्याच्या खुणा आहेत. आपसी वादातून हा खून झाल्याचं सांगितलं जातं.

एक संशयित ताब्यात

सकाळी रामनगर पोलिसांनी खुनाची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथकाच्या मदतीनं तपास सुरू केला. संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन गटांमध्ये वाद असावा, यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मृतक गुन्हेगारी प्रवृत्तीचा

मृतक धर्मवीर हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. दुसऱ्या गुंडाकडून त्याची हत्या झाली असावी. त्याचे प्रतिस्पर्धी गुंड कोण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें