AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होताच सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांची आठवण काढत म्हणाल्या, यापुढे पक्ष…

सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होताच सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांची आठवण काढत म्हणाल्या, यापुढे पक्ष...
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2026 | 7:13 PM
Share

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती दाखवली. त्यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आता राज्यात नवे सुनेत्रा पवार पर्व सुरू झाले आहे, असे म्हणत भविष्यात राष्ट्रवादी पक्ष चांगली प्रगती करेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असून पक्षाच्या विढीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. हे भाषण करताना सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना भरून आलं.

आपला पक्ष माणसांशी नातं सांगणारा

या अधिवेशनात बोलताना, एखादी गोष्ट करायची ठरवली की अजितदादा ती गोष्ट सिद्ध करून दाखवायचे. आपला राष्ट्रवादी पक्ष देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणार आहे. जनतेशी नाळ जुळलेला आपला पक्ष आहे. आपल्या देशाची निर्मितीच मुळात संघर्षातून झालेली आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला. संघर्षातूनच हा पक्ष वाढला, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.

ही जबाबदारी अत्यंत कठीण असली तरीही…

आदरणीय अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या अपार दु:खातून आपण अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मीही या पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण, समाजकारण करताना माझ्यासाठी सगळंकाही नवं नव्हतं. अजितदादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्षे संसार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुमच्या साथीने ही जबाबदारी अजिबात अशक्य नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हा सन्मान माझा नसून प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. हा सन्मान माताभगिनीचा आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार जपला. याची जाणीव आपल्याला आहे. अजितदादांनी या विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. हाच विचार आपल्यालाही जपायचा आहे, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले. तसेच अजितदादांनी ज्या-ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत, असे म्हणत भविष्यात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...