मुंबईत वातावरण तापलं, भाजप उमेदवार महिरी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा दावा केला जातोय.

मुंबईत वातावरण तापलं, भाजप उमेदवार महिरी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?
मुंबईत वातावरण तापलं, भाजप उमेदवार महिरी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड
| Updated on: May 17, 2024 | 9:57 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसह राज्यातील एकूण 13 जागांवर येत्या 20 मे ला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मोठमोठ्या सभा पार पडत आहेत. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना आणखी राजकीय एक मोठी घटना घडली आहे. मुंबईत ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुंलुंड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटाच मोठा राडा झाला आहे. या मतदारसंघात भाजपकडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिर कोटेचा यांच्याकडून पैशांचं वाटप केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याच आरोपांवरुन ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यावेळी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा दावा काय?

“इथे आमच्यासमोर आमच्या कार्यालयावर येऊन हल्ला केला”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका कार्यकर्त्याने दिली. “आम्ही दादरला चाललो होतो. पण कार्यालयासमोर काही महिला पैसे घेऊन शिवीगाळ करत होत्या. 50 महिला इथे उभ्या राहिल्या. आमच्या पक्षाला शिव्या घालतात, आमच्या नेत्याला शिव्या घालतात. मग आम्ही काय ऐकून घेणार? आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. ते पैसे घेऊन आलेल्या बायका आहेत. आम्हाला चोरलोकं नकोत. आम्हाला गुंडागर्दी नकोय. ही गुंडागिरी चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका भाजप महिला कार्यकर्ताने दिली.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप काय?

पोलीस काही करत नाही. कारण पोलिसांना पैसे भेटले आहेत. पोलीस सेट आहेत. भाजपच्या मिहीर यांनी जे केलं, मराठी माणसाला त्रास देता ना, आता बघ मराठी माणासाची ताकद काय आहे ते. हे चोर आहेत. आमच्या बहिणीला ढकललं आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस व्हॅनमध्ये अटक केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिली. तर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीदेखील टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यासमोर बोलू लागली. मला पोलिसांनी खाली ढकललं आहे. यांची दादागिरी आहे, असा आरोप महिला कार्यकर्ताने केली.

देवेंद्र फडणवीस मिहीर कोटेचा कार्यालयात दाखल

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी मोठा राडा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: महायुतीची शिवाजी पार्क येथील सभा आटोपल्यानंतर मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील सभास्थळी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड देखील महिरी कोटेचा यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. फडणवीसांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.