रात्री 10 नंतर डिजे वाजवण्यास नकार, डिजेवाल्याला खोलीत डांबून गुप्तांगावर सिगारेटचे चटके

डिजे वादकांनी रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजविण्यास नकार दिल्यामुळे नराधमांनी मारहाण केली. सध्या दोन्ही पीडित तरुण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित आरोपींवर नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रात्री 10 नंतर डिजे वाजवण्यास नकार, डिजेवाल्याला खोलीत डांबून गुप्तांगावर सिगारेटचे चटके

नाशिक : नाशिक शहरातील दोन डिजे वादकांना काही नराधमांनी अमानुष मारहाण करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (DJ Players sexual abused in birthday party). नाशिकमधील दरीमातोरी गावातील एका फार्महाऊसवर वाढदिवसाची पार्टी सुरु असतांना हा प्रकार घडला.

डिजे वादकांनी रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजविण्यास नकार दिल्यामुळे ही घटना घडली (DJ Players sexual abused in birthday party). सध्या दोन्ही पीडित तरुण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित आरोपींवर नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश काजळे या तरुणाचा 9 जानेवारी रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्ताने नाशिकच्या दरीमातोरी गावातील एका फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी रात्री साडे दहानंतरही सुरुच होती. दरम्यान, डिजे वादकांनी रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजवण्यास नकार दिला. कायद्यानुसार रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजवता येत नाही, असे कारण त्यांनी सांगितले. मात्र, पार्टीतील दहा ते बारा जणांनी डिजे बंद केला म्हणून त्यांना मारहाण केली.

डिजे सुरु असताना अचानक बंद का केला? असा आरडाओरड करत दहा ते बारा जणांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी दोन्ही डिजे वादकांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. हे प्रकरण मारहाणीपर्यंतच न थांबता लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत गेले. आरोपींनी पीडितांचे कपडे काढून त्यांच्या गुप्त अंगांवर सिगारेटचे चटके दिले. नराधमांनी पीडितांना बेल्ट आणि बांबुने मारहाण केली. पीडितांच्या अंगावर थंड पाणी टाकत ठिकठिकाणी विजेचा शॉकही दिला. यासोबतच दारुच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्यांनी मारहाण करत रात्रभर अत्याचार केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

या प्रकरणातील दोघेही पीडित तरुण गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत पीडितांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. संशयित आरोपींपैकी काही जणांचा राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होते का? की वेगळे वळण लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published On - 11:40 am, Sun, 12 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI