मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपला शिकवू नका: प्रवीण दरेकर

मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्यांनी भाजपला आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. | Pravin Darekar

मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपला शिकवू नका: प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 2:18 PM

मुंबई: मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले. त्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि छत्रपतींच्या सन्माविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 1999 पासून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती.

त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम तुमच्या सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते हायकोर्टातही टिकवले. आमचे सरकार होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका तरी दाखल करा, असा टोला त्यांनी हाणला.

‘तेव्हा भाजपने संभाजीराजे छत्रपतींचा सन्मान केला होता’

केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले. काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आपल्याला आमदारकी मिळेल यासाठी सदैव वाट पाहत या आशेने खुळावलेल्या सचिन सावंत यांनी उगाच छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये, असेही दरेकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

‘प्रियांका, कंगनाला भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान’

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.