IPS अधिकाऱ्याच्या पतीला अटक, 263 कोटींच्या TDS घोटाळ्याचे प्रकरण नेमके काय?
ED Raid: आयकर रिटर्न घोटाळा (टीडीएस) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा प्रकार मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीकडे तपास गेला. ईडीने गेल्या वर्षी माजी प्राप्तिकर अधिकारी तानाजी मंडळ याला अटक केली होती.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 263 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. टीडीएस फसवणूक प्रकरणात राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक केली. पुरषोत्तम चव्हाण असे त्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण यांना 27 मे पर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. चव्हाण यांनी पुरावे नष्ट करून तपासात अडथळा आणण्याचा आरोप ईडीने केला आहे.
टीडीएस घोटाळा प्रकरणात ईडीने यापूर्वी मुख्य आरोपी तसेच माजी वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडळ अधिकारी, भूषण पाटील, राजेश शेट्टी आणि राजेश ब्रिजलाल बत्रेजा यांना अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण यांना ईडी कोठडी दिली. आरोपी आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात असताना त्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट टीडीएस परतावा तयार केल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 168 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम चव्हाण यांच्या घरी छापेमारी
पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक करण्यापूर्वी ईडीने त्यांच्या घरी छापेमारी केली. त्यात अनेक संशयास्पद कागदपत्र, विदेशी करन्सी, मोबाइल फोन जप्त केला. पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक करण्याच्या चार दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील व्यावसायिक राजेश बतरेजा यांना अटक केली होती.
ED has arrested Purshottam Chavan under the provisions of PMLA, 2002 in the case of Tanaji Mandal Adhikari & Others (Income Tax TDS refund fraud of Rs. 263 Crores) and subsequently produced before the PMLA Court, Mumbai on 20.05.2024. Court has granted ED custody till 27 May.
— ANI (@ANI) May 22, 2024
काय आहे प्रकरण
आयकर रिटर्न घोटाळा (टीडीएस) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा प्रकार मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीकडे तपास गेला. ईडीने गेल्या वर्षी माजी प्राप्तिकर अधिकारी तानाजी मंडळ याला अटक केली होती. तानाजी मंडळ यांच्याकडे आयकर परताव्याचे काम होते. त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड होते. त्या माध्यमातून ते परतावा करत होते. तानाजी मंडळ यांनी त्यांचे मित्र असलेले भूषण पाटील आणि राजेश शेट्टी यांच्या कंपनीत आयकर परतावा देण्याचे काम सुरु केले. नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान एकूण 12 प्रकरणात 263 कोटी रुपयांचा परतावा त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी हे पैसे दुबईत पाठवले. त्यानंतर भारतात दोन कंपन्यांची निर्मिती केली. या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतवण्यात आला.
