अमित चांदोलेच्या कोठडीसाठी ईडी हायकोर्टात, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ

टॉप ग्रुप सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईकांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोलेला अटक झाली होती

अमित चांदोलेच्या कोठडीसाठी ईडी हायकोर्टात, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 1:10 PM

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरनाईकांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोलेची (Amit Chandole) कोठडी वाढवण्यासाठी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. (ED to go to Bombay High Court for Amit Chandole’s Custody increases Pratap Sarnaik’s tension)

टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अमित चांदोलेला 25 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सरनाईकांच्या वतीने चांदोलेने पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. ईडी अमित चांदोलेची कसून चौकशी करत असून चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच चांदोलेच्या ईडी कोठडीत वाढ करणं सरनाईकांसाठी मोठा धक्का मानला जातो.

ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. छापेमारीनंतर विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) याची ईडीकडून पाच तास चौकशी करण्यात आली होती.

प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागेल. याशिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात ईडीला कळवलं होतं. त्यानुसार क्वारंटाईन कालावधी संपल्यावर चौकशीला हजर राहण्याची मुभा ईडीने प्रताप सरनाईकांना दिली होती.

दुसरीकडे, ईडी अधिकाऱ्यांनी चौथ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक चौकशीसाठी हजर राहिला नाही. त्यामुळे आता ईडी विहंगवरही कडक कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच सरनाईक पितापुत्रांनी ईडी चौकशीला विलंब केला असताना चांदोलेच्या चौकशीमुळे दोघांवर कारवाईची टांगती तलवार आहे. (ED to go to Bombay High Court for Amit Chandole’s Custody increases Pratap Sarnaik’s tension)

संबंधित बातम्या : 

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी; प्रताप सरनाईक यांना झटका

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

(ED to go to Bombay High Court for Amit Chandole’s Custody increases Pratap Sarnaik’s tension)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....