एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान संसर्गाची शक्यता

पोलीस विभागातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे (Encounter Specialist Daya Nayak infected with Corona).

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान संसर्गाची शक्यता

मुंबई : पोलीस विभागातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे (Encounter Specialist Daya Nayak infected with Corona). मागील 2 दिवसांपासून त्यांना सातत्याने ताप येत होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. दया नायक सध्या एटीएसमध्ये नियुक्त असून एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.

सध्या दया नायक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमक्यांच्या तपासाचं काम आहे. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत आहेत. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.

दया नायक या धमकी प्रकरणाचा तपास करत असताना सतत आरोपींच्या शोधात बाहेर फिरत होते. ते काही आरोपींच्या संपर्कातही होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दया नायक यांना सध्या होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची धडक कारवाई, गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात बेड्या

दरोड्यातील रक्कम नेपाळच्या माओवाद्यांना, मुंबईत दया नायक यांच्या पथकाकडून दरोडेखोराला अटक

व्हिडीओ पाहा :

Encounter Specialist Daya Nayak infected with Corona

Published On - 8:13 pm, Mon, 21 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI