मुंबईतील क्लीन अप मार्शलच्या कोटवर त्याची ओळख असणार; गैरवर्तणुकीची महापौरांकडून गंभीर दखल

| Updated on: Jul 17, 2021 | 8:22 PM

मुंबईतील काही क्लीन अप मार्शल हे प्रसारमाध्यम प्रतिनिधी व नागरिक यांच्याशी करीत असलेल्या गैरवर्तणूकीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.

मुंबईतील क्लीन अप मार्शलच्या कोटवर त्याची ओळख असणार; गैरवर्तणुकीची महापौरांकडून गंभीर दखल
किशोरी पेडणेकर, महापौर,मुंबई
Follow us on

मुंबई : मुंबईतील काही क्लीन अप मार्शल हे प्रसारमाध्यम प्रतिनिधी व नागरिक यांच्याशी करीत असलेल्या गैरवर्तणूकीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीन अप मार्शल यांची महापौर निवासस्थानी आज (17 जुलै) रोजी बैठक घेतली. (Every a clean up marshal in Mumbai will get his identity on his coat, Mayor Kishori Pednekar orders)

महापौर किशोरी पेडणेकर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हणाल्या की, काही क्लीन अप मार्शलची गैरवर्तणूक योग्य नसून त्याचे समर्थन करता येणार नाही. याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी महत्त्वपूर्ण सूचना केली. यामध्ये क्लीन अप मार्शल परिधान करत असलेल्या गणवेशावरील कोटवर संबंधित क्लीन अप मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे नाव तसेच संबंधित कंत्राटदार याची माहिती द्यावी, क्लीन-अप मार्शल परिधान करीत असलेल्या कोटच्या समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, अशा पद्धतीने माहिती दिसली पाहिजे. जेणेकरून ठळकपणे त्याची ओळख सर्वांना समजेल तसेच बोगस क्लीन-अप मार्शल काम करीत असेल तर त्याचा सुद्धा शोध घेणे सहज सुलभ होईल.

महापौरांनी सुचवलेल्या निर्देशाप्रमाणे या पद्धतीचा कोट तयार करून पुढील आठवड्यात सादर करावा, जेणेकरून यावर अंतिम निर्णय घेऊन हा कोट संपूर्ण मुंबईतील क्लीन-अप मार्शलला लागू करता येईल, असे महत्त्वपूर्ण निर्देश महापौरांनी यावेळी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

होय ती अफवाच, दुबईहून आलेल्या खासगी विमानत स्फोटकं सापडले नाहीत, खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध सुरु

मालाडमध्ये मेट्रो कामांसाठी घरांवर कारवाई, अनेक कुटुंब भर पावसात बेघर, प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

लाच दिली असेल तर मग त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचे ईडीला 4 सवाल

(Every a clean up marshal in Mumbai will get his identity on his coat, Mayor Kishori Pednekar orders)