
Explainer BMC Mayor: मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहेत. देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा गड कोण सर करणार ही चर्चा असतानाच महापौर मराठी भाषिक होईल की अमराठी हा मुद्दा प्रचारात गाजला. गेल्या वर्षभरापासून मुंबईत भाषिक राजकारण पेटवण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाल्याचे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते सत्ताधारी आणि विरोधकांकडून या मुद्दाला सातत्याने हवा देण्यात आली. मुंबई ही मराठी भाषिकांची की गुजराती, हिंदी, तमिळ भाषिकांची यावर खल करण्यात आला. त्यातच महापौर हा हिंदू होणार या वक्तव्यानं गहजब उडाला. मराठीवरून राजकारण तापले. गेल्या जवळपास तीन दशकांपासून मुंबईचा महापौर हा मराठी भाषिक आहे. पण आतापर्यंत किती अमराठी महापौर मुंबईला लाभले? राजकीय अस्मितेचा प्रश्न ...