AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोस्टल रोड बोगद्यात अपघात, फॅशन इन्फ्लुएंसरच्या गाडीला धडक, महिला जखमी

Mumbai News: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात इन्फ्लुएंसर महिला जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरु आहे.

कोस्टल रोड बोगद्यात अपघात, फॅशन इन्फ्लुएंसरच्या गाडीला धडक, महिला जखमी
लाडक्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या आजोबांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Jul 15, 2025 | 8:44 AM
Share

मुंबईतील मलबार हिलजवळील कोस्टल रोड बोगद्यात अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. एका १८ वर्षीय मुलाने एका फॅशन इन्फ्लुएंसरच्या कारला धडक दिली. या अपघातात फॅशन इन्फ्लुएंसर महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कसा झाला अपघात?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडवरील बोगद्याच्या गेट क्रमांक ८ जवळ रविवारी रात्री १० वाजेच्या जवळपास अपघात झाला. तक्रारदार महिला प्रभादेवीहून मरीन ड्राइव्हकडे जात होती. बोगद्याच्या गेट क्रमांक ८ जवळ एका भरधाव कारने तिच्या गाडीला मागून धडक दिली. या अपघातात त्या महिलेला दुखापत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, ती महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे.

आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना

आरोपीचे नाव व्योम मनीष पोद्दार असे आहे. तो १८ वर्षांचा आहे. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही आहे. त्याने बोगद्यात मागून इन्फ्लुएंसरच्या गाडीला धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला आणि इन्फ्लुएंसर महिला जखमी झाली. अपघातानंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आता तिची प्रकृती चांगली आहे.

फॅशन इन्फ्लुएंसरने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोद्दारविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम २८१ आणि १२५ (अ) अंतर्गत निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

कोस्टल रोडवर भरधाव वेगामुळे अनेक अपघात

दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडचा पहिला पार्ट ११ मार्च २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर दुसरा पार्ट २६ जानेवारी २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे हे अपघात झाले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.