AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळीतील हॅपी होम स्कूलला आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल; आग नियंत्रणात

वरळीमधील हॅपी होम स्कूलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हॅपी होम ही अंधांची शाळा असल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर निंयत्रण मिळवण्यात आले आहे.

वरळीतील हॅपी होम स्कूलला आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल; आग नियंत्रणात
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 8:05 AM
Share

मुंबई : वरळीमधील हॅपी होम स्कूलला (Happy Home School)आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. हॅपी होम ही अंधांची शाळा (School) असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. शाळा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. लेव्हल वनची ही आग असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत काही प्रमाणात वित्तहानी झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापसमोर आलेले नाही. घटनेच्या वेळी शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग अटोक्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लेव्हल वनची आग

घटनेबाबत बोलताना अग्निशमन दराचे अधिकारी सी. आर. पवार यांनी सांगितले की, वरळीमध्ये असलेल्या हॅपी होम या स्कूलला आग लागली होती. आग शाळेच्या तीसऱ्या मजल्यावर लागली होती. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी तातडीने पाठवण्यात आल्या. अग्नशमन दलाने काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले. आग वेळेत अटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग लव्हल वनची आग होती. आग नेमकी कशामुळे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मोठा अनर्थ टळला

हॅपी होम शाळेच्या इमरतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. शाळा इमरतीच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली होती. जेव्हा ही आग लागली तेव्हा शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शाळेत मुले असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग लेव्हल वनची असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लगल्याने परिसरात काही काळ गोधंळाचे वातावरण होते.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा