माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?
अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 6:05 PM

मुंबई : 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, न्यायालयानं काल दिलेला निकाल बोलका आहे. आरोपी असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

>

अनिल देशमुख यांची सुटका झाली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेकडं उशीर होत असला तरी न्याय मिळतो. देर आये लेकिन दुरुस्त आये, असा आजचा प्रकार होतोय. राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडीनं अनिल देशमुख हे काम करतील, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेली तेरा महिने कुणीच भरून काढणार नाही. अतिशय बोलका निकाल देणारं न्यायालय आपण काल पाहिलं. या तेरा महिन्यांची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताही आरोप सिद्ध न होता १३ महिने अटक होते. हे फक्त भारतातचं घडू शकतं. या सर्व गोष्टींचा निषेध करत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.