AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Utsav 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच ईद मिलाद-उल-नबी, मुस्लिम समाजाचा मोठा निर्णय

Ganesh Utsav 2023 : मुस्लिम समाजाने मन जिंकून घेणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद मिलाद-उल-नबी एकाच दिवशी आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने एक चांगला निर्णय घेतलाय.

Ganesh Utsav 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच ईद मिलाद-उल-नबी, मुस्लिम समाजाचा मोठा निर्णय
ganpatiImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात सर्वांना प्रिय असलेला सण गणेशोत्सव येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस मुंबईसह राज्यात मोठा उत्साह असतो. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबरला येत आहे. त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची ईद मिलाद-उल-नबी आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी 28 सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीपासून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा, आराधना केली जाते. 10 व्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. मुंबईसह प्रमुख शहरात विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. मोठी गर्दी रस्त्यावर असते. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई आणि पुण्यातील मुस्लिम समुदायाने ईद मिलाद-उल-नबीच सेलिब्रेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या सीरत समितीने मुस्लिमांना 1 ऑक्टोबरला आणि मुंबईतील मुस्लिमांना 29 सप्टेंबरला ईद मिलाद-उल-नबी साजरी करण्यास सांगितली आहे. धार्मिक सहिष्णुता आणि सलोख्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या सीरत समितीचे मौलाना गुलाम अहमद खान कादरी यांनी सांगितलं की, “गणेश उत्सव हा आमच्या हिंदू बंधुंचा सण आहे. 10 दिवस हा उत्सव असतो. शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे ईद मिलाद-उल-नबीची मिरवणूक 28 सप्टेंबरऐवजी 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे” ‘आवाज द व्हॉइस’ने हे वृत्त दिलं आहे. ईद मिलाद-उल-नबी 28 सप्टेंबरलाच

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. यादिवशी गणेश मुर्तीच विसर्जन केलं जातं. ईद मिलाद-उल-नबी यावर्षी 28 सप्टेंबरलाच आली आहे. त्यामुळे सीरत समिती पुणे यांनी आपणहून पुढाकार घेत काही बदल केले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?