ज्वेलर्स उदानींच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहतांचा माजी पीए अटकेत

ज्वेलर्स उदानींच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहतांचा माजी पीए अटकेत

मुंबई: घाटकोपरमधील 57 वर्षीय ज्वेलर्स राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी पीएला अटक करण्यात आली आहे. सचिन पवार असं आरोपीचं नाव आहे. पंतनगर पोलिसांनी सचिन पवारला अटक केलं. दुपारी त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजेश्वर उदानी हे ज्वेलर्स होते. उदानी 28 नोव्हेंबरला घरातून बाहेर पडले, मात्र ते घरी परतलेच नाही. बराच वेळ झाला उदानी घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोनही बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

राजेश्वर उदानी

तपासादरम्यान पनवेल पोलिसांना 4 डिसेंबरला  नेरे गावातील जंगलात एक अज्ञात मृतदेह आढळला. त्या मृतदेहावरील कपड्यांवरुन तो राजेश्वर उदानींचाच मृतदेह असल्याची ओळख पटली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. उदानी यांच्या फोनवर सचिन पावरचे 13 कॉल आले होते. यामुळे पोलिसांनी सचिन पवारला अटक केली.

सचिन पवार हा घाटकोपर विभागात भाजपामधील सक्रीय कार्यकर्ता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सचिन पवारची पत्नीही निवडणूक रिंगणात उभी होती.

“सचिन 2010 पर्यंत सचिव म्हणून माझे काम पाहत होता. मात्र त्यानंतर जास्त काही संबंध नाही” असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी टीव्ही 9 ला दिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI