AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Raut: सात वर्षे छळ… माझा घात केला… आरोपांची मालिका…पत्रकार परिषदेत सून गिरिजा राऊत यांचा गंभीर आरोप काय?

Girija Raut allegation on Vinayak And Gitesh Raut: उद्धव सेनेचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी कुटुंबियांवर आरोपांची मालिकाच उघडली. काय केले गंभीर आरोप?

Girija Raut: सात वर्षे छळ... माझा घात केला... आरोपांची मालिका...पत्रकार परिषदेत सून गिरिजा राऊत यांचा गंभीर आरोप काय?
गिरिजा राऊत
| Updated on: Jul 12, 2026 | 11:56 AM
Share

Girija Raut allegation on Gitesh Raut: उद्धव ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादाने राजकीय जीवनात खळबळ उडवून दिली. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊतांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी गितेश राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन कसा छळ केला गेला याची मालिकाच वाचली. काय म्हणाल्या गिरिजा राऊत?

राऊत कुटुंबियांनी माझा केला घात  

प्रत्येक गोष्टीत त्यांनी सुरुवातीपासून खोटं बोलून पूर्ण प्लानिंगने घात केला आहे. लग्नाच्या आधीच्या गोष्टी आणि नंतरच्या गोष्टी वेगळ्या होत्या. भावनिक आणि शारिरीक छळ केला. माझा आणि माझ्या कुटुंबियांचा घात केला, असा आरोप विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केला. त्यांनी लग्नानंतर सुख लाभले नसल्याचे म्हटले आहे.

राजकीय पार्श्वभूमीमुळे चूप राहिले

सर्वात आधी राजकीय पार्श्वभूमी असल्याने मला गितेश सोबत चांगला संसार करत होतो. त्यामुळे तक्रार केली नाही. आज ना उद्या परिस्थिती बदलेल अशी आशा होती. म्हणून सहन केले, अशी भूमिका गिरिजा राऊत यांनी मांडली. फ्लॅट आणि पैसे या गोष्टी खोट्या आहेत. खोटे आरोप आहेत. माझ्यावरील आरोप लपवण्यासाठी ते खोटं स्टेटमेंट देत आहेत, असा आरोप त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.

तक्रारींचा वाचला पाढा

२०१७मध्ये लग्न झालं. २०१८पर्यंत संबंध आले नव्हते. दोन्ही कुटुंबाने बसून बोलणी केली. गणपतीवरून आल्यावर त्यावर बोलणार होते. गणपतीवरून आल्यावर एक घाबरवणारी घटना घडली. त्याला अघोरी रूप दिलं. त्यांनी ते सुरूच ठेवलं. अघोरी कृत्य केलं. हायपोथायराईड असूनही आऔषधे दिली. मला मानसिक त्रास दिला, असे गिरीजा राऊत म्हणाल्या.

ज्यांनी मला जवळून पाहिलं त्यांना माहीत आहे. अनेक ठिकाणी पैसे उकळण्याची मला संधी होती. पण मी तसं केलं नाही. नवऱ्यासोबत सुखी संसार करणं एवढीच अपेक्षा होती. पण त्यांनी मला अपमानित केलं. माझ्यासोबत घाणेरडे कृत्य केले, अघोरी प्रकार केले असा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे