AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेट्सच्या सुट्या विक्रीवर येणार बंदी, संसदेच्या समितीची शिफारस

पार्लेमेंटरी कमिटीने देशाच्या सर्व विमानतळावर स्माेकींग झाेन स्थापन करण्याचीही शिफारस केली आहे. येत्या अर्थसंकल्पाच्या आधीच सिगारेट्सच्या सुट्या स्वरुपाच्या विक्रीवर बंदीचा निर्णय अमलात येण्याची शक्यता आहे.

सिगारेट्सच्या सुट्या विक्रीवर येणार बंदी, संसदेच्या समितीची शिफारस
cigarettesImage Credit source: cigarettes
| Updated on: Dec 12, 2022 | 3:45 PM
Share

मुंबई :  सिगारेट्सचे शौकीन असणाऱ्यांच्या आता खिसाला चांगलाच चाट पडणार आहे. कारण केंद्र सरकारने लवकरच सिगारेट्सच्या ( cigarettes ) सुट्या स्वरूपातील विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने आता सिगारेट्सच्या सुट्या स्वरूपातील विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तबांकूच्या विक्रीवर अंकुश आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

पार्लमेंटची स्टँडींग कमिटीने सिगारेटच्या सुट्या स्वरूपातील विक्रीवर बंधी घालण्याची शिफारस केली आहे. सिगारेटचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याकरीता जादा पैसे खर्च करावे लागतात, म्हणून एकेक सिगारेट्स विक्रीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे एकेक सिगारेट्स ऐवजी संपूर्ण पाकीट्स विक्रीचे बंधन लादल्यास सिगारेट्स विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात तरी कमी होईल असे पार्लेमेटरी कमिटीचे म्हणणे आहे. या सिगारेट्सच्या विक्रीबाबतच्या निर्बंधांबाबत येत्या आर्थिक संकल्प 2023-24 आधी निर्णय येऊ शकतो असे सरकारचे म्हणणे आहे. एकेक स्वरूपात सिगारेट्सची विक्री किंवा निर्मिती अशा दोन्ही बाबींवर बंदीची शिफारस समितीने केली आहे.

केंद्रसरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिफारसीवरून यापूर्वी 2019 मध्ये ई- सिगारेट्सवर बंदी घातली आहे. पार्लेमेंटरी कमिटीने देशाच्या सर्व विमानतळावर स्माेकींग झाेन स्थापन करण्याचीही शिफारस केली आहे. जीएसटीच्या अमलबजावणीनंतरही केंद्र सरकारने तंबाकूजन्य वस्तूंच्यावर जास्त जीएसटी आकारला नसल्याकडेही कमिटीने दिशानिर्देश केले आहेत. तंबाकू आणि अल्काेहलच्या अतिसेवनाने कॅन्सरचा धाेका वाढत असल्याचे कमिटीने म्हटले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.