AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grapes Mahotsav : पर्यटन संचालनालयामार्फत द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार

महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार आहे. या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.t

Grapes Mahotsav : पर्यटन संचालनालयामार्फत द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत.
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 11:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन संचालनालया (Directorate of Tourism) मार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 18 ते 20 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवा (Grapes Mahotsav) चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन आदीचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नरमध्ये आयोजित द्राक्ष महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कलाकुसर करणारे कारागीर, बचतगट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल. यामध्ये विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. (Grape Festival organized by the Directorate of Tourism in Junnar, Pune)

रात्री कँप फायरची व्यवस्था

महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार आहे. या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था असणार आहे.

पक्षी निरीक्षणाची संधी

जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समूह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील बाजार पाहता येईल व खरेदी करता येईल.

द्राक्ष बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पाऊल

पर्यटक इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या, पुणे येथील उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे. (Grape Festival organized by the Directorate of Tourism in Junnar, Pune)

Mithi River : मिठी नदीकडे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी फिरवली पाठ, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती

थोरल्या पवारांकडून रोहित पवारांच्या खांद्यावर अजून एक मोठी जबाबदारी, कोणत्या मतदारसंघात आता रोहित पवारांचा शब्द प्रमाण?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.