कधीही न थांबणारं शहर आज स्तब्ध, धैर्याने लढूया, पालकमंत्र्यांचं मुंबईकरांना भावनिक आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील मुंबईकरांना जनता कर्फ्यू पाळण्याचं भावनिक आवाहन केलं आहे (Minister Aslam Shaikh on Janta Cufew).

कधीही न थांबणारं शहर आज स्तब्ध, धैर्याने लढूया, पालकमंत्र्यांचं मुंबईकरांना भावनिक आवाहन
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 8:06 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरासाठी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे (Minister Aslam Shaikh on Janta Cufew). पंतप्रधान नरेंद्र यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील मुंबईकरांना जनता कर्फ्यू पाळण्याचं भावनिक आवाहन केलं आहे (Minister Aslam Shaikh on Janta Cufew).

अस्लम शेख नेमकं काय म्हणाले?

“माझ्या मुंबईकर बांधवांनो आणि भगिनींनो, ‘कोरोना’ नावाच्या जागतिक आपत्तीविरोधात लढण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. कधीही न थांबणारं शहर अशी ज्या शहराची ख्याती आहे ते शहर आज स्तब्ध झालं आहे. या शहराने बॉम्बस्फोट पाहिले, या शहराने दंगली पाहिल्या, या शहराने अतिरेकी हल्ले पाहिले, या शहराने 26 जुलै सारखी नैसर्गिक आपत्ती पाहिली. पण तरीही हे शहर कधी थांबलं नाही. चिंतेची एक साधी सुरकुतीही या शहराच्या कपाळावर कधी उमटली नाही. कारण हे शहर फक्त शहर नाही, तर जगाला ‘फायटींग स्पिरिट’ काय असतं हे दाखवून देणारं प्रेरणास्थान आहे. हेच फायटींग स्पिरिट आपल्याल्या या ‘कोराना’ विरोधातल्या युद्धातदेखील दाखवायचं आहे”, असं अस्लम शेख म्हणाले.

“यावेळी आपल्या आक्रमणाचं स्वरुप थोंडं वेगळं आहे. प्रत्येक संकटात आपण मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन आपल्या शत्रूला नामोहरम केलं. पण हे स्त्यावर उतरुन लढायचे युद्ध नाही. हे युद्ध घरी बसून थोडा समजुतदारपणा दाखवून लढायचं युद्ध आहे. पालकमंत्री या नात्याने मी आपणास आवाहन करतो की, आलेल्या संकटाचा आपण धैर्याने सामना करुया यासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करुया”, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं.

हेही वाचा : Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई

जनता कर्फ्यू दरम्यान ‘या’ लोकांना बाहेर पडण्यास परवानगी

जनता कर्फ्यूदरम्यान कोणत्याही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान कोणताही नागरिक सोसायटी किंवा पार्कमध्ये फिरु शकणार नाही. मात्र जर कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली तर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यादरम्यान कोणत्याही रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्यात येणार नाही.

जनता कर्फ्यूदरम्यान पोलीस, मीडिया, डॉक्टर, साफ-सफाई कर्मचारी या लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. या व्यक्तींना पंतप्रधान मोदींनी घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे.

मुंबईत काय सुरु राहणार?

सरकारी आणि खासगी रुग्णालय औषधं दुकाने किराणा दुकाने दूध डेअरी सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी ) रेल्वे, बेस्ट बस

मुंबईत ‘या’ सुविधा बंद?

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद मोठे मॉल बंद जिम , जलतरण तलाव सिनेमागृह मुंबई पुणे ट्रॅव्हल बंद खासगी कम्पन्या बंद शाळा कॉलेज मोठ्या चौपट्या बंद उद्यान बंद लग्नाचे हॉल काही प्रमाणात बंद मच्छीमार्केट बंद मुंबईतील छोटी मोठी मंदिरे बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 मार्च) रात्री आठ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आज संपूर्ण देशभरात (Janta Curfew Live) जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.