AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana and Ravi Rana : न्यायालयीन कोठडी होताच राणा दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर तणाव, कोर्टाबाहेर येताच मीडियाला पाहून हातही जोडले; व्हिडीओत दृश्य कैद

Navneet Rana and Ravi Rana : नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले.

Navneet Rana and Ravi Rana : न्यायालयीन कोठडी होताच राणा दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर तणाव, कोर्टाबाहेर येताच मीडियाला पाहून हातही जोडले; व्हिडीओत दृश्य कैद
न्यायालयीन कोठडी होताच राणा दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर तणावImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2022 | 3:00 PM
Share

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा दोघांचेही चेहरे पडले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काल पोलीस ठाण्यात जाताना राणा दाम्पत्यांकडून मीडियाच्या दिशेने हात उंचावून जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. पण आज नवनीत राणा यांचा चेहरा पडला होता. मात्र, मीडियाने आवाज देताच दोघांनीही हात जोडले आणि निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही दोन वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवून तुरुंगाच्या दिशेने घेऊन गेले.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली तर रिजवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू मांडली. तब्बल 25 मिनिटे कोर्टात युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर या दोघांनी तात्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र कोर्टाने येत्या 27 एप्रिल रोजी सरकारी वकिलांना जामिनावर लेखी निवेदन देण्यास सांगितलं. तसेच येत्या 29 एप्रिल रोजी या अर्जावर युक्तिवाद करण्यात येणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.

व्हिडीओ काय सांगतो?

राणा दाम्पत्याला जामीन नाकारल्यानंतर त्यांना घेऊन पोलीस कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा नवनीत राणा यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. रवी राणा हे सुद्धा तणावात दिसत होते. दोघांनीही आधी मीडियाकडे पाहिले नाही. मात्र, पत्रकारांनी आवाज देताच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दोन्ही हात जोडले. हात उंचावले आणि दोघांनी लगेच दुसरीकडे तोंड फिरवलं. त्यानंतर या दोघांनाही वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवलं गेलं. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी आम्हाला फसवलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. जय श्रीराम म्हणणं गुन्हा आहे का? रावणाचाही अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? असा सवाल रवी राणा यांनी केला. तर नवनीत राणाही व्हॅनमधून हात उंचावून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, काल ज्या आवेशात त्या बोलत होत्या. तो आज आवेश दिसला नाही. घोषणा देतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता.

दोघांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवणार

रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रथम सांताक्रुझला वैद्यकिय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. त्यांना कोव्हिड नसल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात नेणार आहेत. रवी राणा यांना ऑर्थर रोड तुरुंगात नेण्यात येणार होतं. मात्र, तिथली कैद्यांची क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्या कैद्याला प्रवेश नसल्याने त्यांना तळोजा तुरुंगात नेण्यात येत आहे. तर नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार