Rajesh Tope :…. तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या 1400 वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल.

Rajesh Tope :.... तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 7:56 PM

मुंबई : देशभरात तसेच राज्यातही नवीन वर्षाच्या स्वागताची जल्लोषी तयारी सुरू आहे. तसेच सगळीकडे नाताळच्या सेलिब्रेशनचीही जोरदार धूम आहे. या निमित्ताने गर्दोचे चित्र दिसत आहे. या गर्दीत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भिती आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. अशातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचाही संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनची गरज भासणार आहे. प्रसंगी ऑक्सिजनचा तुटवडाही भासू शकतो. ऑक्सिनच्या अनुषंगाने राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असे मोठे विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

ओमिक्रॉनची परिस्थिती भितीदायक नाही, पण काळजी घ्या

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या 1400 वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केले.

… तर लॉकडाऊन केले जाईल

ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रिक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत असल्याचे टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा तसा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावे, असेही आवाहन टोपे यांनी केले आहे. (Health Minister Rajesh Tope’s big statement about lockdown)

इतर बातम्या

Omicron : शाळा सुरूच राहणार; नवा निर्णय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित