BIG BREAKING | कोरोनाचा नवा व्हेरियंट सहा जिल्ह्यांमध्ये धडकला, आरोग्यमंत्र्यांकडून मोठी बातमी

कोरोनाचा नवा व्हेरियंट महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांमध्ये पोहोचला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. पण तानाजी सावंत यांनी काळजी करण्याचं कारण नाही. तरीही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

BIG BREAKING | कोरोनाचा नवा व्हेरियंट सहा जिल्ह्यांमध्ये धडकला, आरोग्यमंत्र्यांकडून मोठी बातमी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 9:08 PM

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) पुन्हा डोकंवर काढताना दिसत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. हा व्हेरियंट राज्यातील तब्बल सहा जिल्हायंमध्ये पसरला असल्याची माहिती स्वत: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. पण तरीही नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कारण सध्या तरी तशी परिस्थिती नाही आणि कोरोनाचा नवा व्हेरियंट फार घातक आहे, असं सध्या तरी निदर्शनास आलेलं नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पण तरीही आरोग्यमंत्र्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

“राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मी आवाहन करतो की, ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो. महापालिका स्तरावर पूर्ण तयारी आहे. घाबरायचे कारण नाही”, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

घाबरण्याचे कारण नाही, पण…

“आता यात्रा, उरूस सुरु होतील. जोखमीचे पेशंट असतील त्यांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे. जाताना मास्क वापरा जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील. हा घाबरणारा व्हेरियंट नाही. जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जनतेला कळकळीचे आवाहन आहे की पर्यटन, लग्न, यात्रेत जाताना काळजी घ्यावी”, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

“या व्हेरियंटची 6 जिल्ह्यांमध्ये वाढ झालीय. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. याच ठिकाणी स्प्रेडर आहेत. पण एकही रुग्ण व्हेंटिलेटर किंवा आयसीयूत नाही”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

“मास्क वापरण्याची सक्ती राज्यात नाही. आम्ही आवाहन करत आहोत ज्याला त्रास होतोय त्यांनी मास्क वापरावा. आम्ही जे कोविड रुग्णालय होते, ते सुसज्ज करत आहोत. पुन्हा मॉक ड्रिल केले जाईल. लसींचा पुरवठा पूर्ववत केला जाईल”, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

राज्यात दिवसभरात 248 नवे कोरोनाबाधित

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 248 नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा हा 500 पुढे जाताना दिसतोय. पण त्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची नोंद ही कमी आहे. राज्यात सध्या 3 हजार 532 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.