AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Update | मुंबईत पावसामुळे काय स्थिती? कुठे साचू शकत पाणी? जाणून घ्या

Mumbai Rain Update | मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय.पुढच्या 2-3 दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Mumbai Rain Update | मुंबईत पावसामुळे काय स्थिती? कुठे साचू शकत पाणी? जाणून घ्या
Mumbai Rain (File photo)Image Credit source: PTI
| Updated on: Jul 18, 2023 | 7:39 AM
Share

गोविंद ठाकूर/सुनील जाधव

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईकरांची सोमवारची सकाळ मुसळधार पावसाने झाली होती. आजही तीच स्थिती आहे. सोमवार मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि दहिसर परिसरामध्ये रात्रीपासून अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

मुंबई शहर म्हणजे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अजून तरी, कुठेही पाणी साचल्यासारखी स्थिती नाही.

मुंबईत कुठे पाणी भरू शकतं?

कालही सकाळच्या सुमारास असाच पाऊस झाला होता. रविवारी मध्यरात्री या पावसाला सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. आज मंगळवारी सकाळी अनेक भागांना पावसाने झोडपून काढलय. पावसाचा असाच जोर राहिला, तर अंधेरी सबवे, मालाड सबवेसह अनेक सखल भागात पाणी साचू शकतं.

हवामान विभागाचा काय अलर्ट आहे?

पावसामुळे अजूनतरी मुंबई रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे, त्यात अजून तरी कुठे अडथळा आलेला नाही. तिन्ही मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबईकर बेस्टवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. तिथेही सर्व सुरळीत आहे. पुढच्या 2-3 दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत पावसामुळे काय स्थिती आहे?

कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे. मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण रामबाग परिसरात रत्यावर पाणी साचल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे.

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल