Rain Update : मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

Mumbai Rain Update : मुंबईत गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

Rain Update : मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 3:13 PM

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाची गेल्या काही तासांपासून संततधार सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे.  मुंबईत संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईत मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. पावसाचा जोर पाहता आता सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अजूनतरी रेल्वे वाहतुकीवर काहीच परिणाम झाल्याचं वृत्त नाही. पण काही ठिकाणी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं दिसत आहे.

मुंबईत पावसाची काय आहे स्थिती?

दादर, किंग्स सर्कल, माटुंगा आणि सायन मधील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. एक फुटांपर्यंत पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना आपलं इच्छित ठिकाण गाठावं लागत आहे. तसेच वाहतूक कोंडीही झाली आहे. बेस्ट सेवेनंही स्थिती पाहता त्या ठिकाणाहून वाहतूक वळवली आहे.  सध्याची स्थिती पाहता घटनास्थळी महापालिकेचे कर्मचारी तैनात आहेत. तसेच पंम्पिंगच्या सहाय्याने सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा केला जात आहे.

मरिन ड्राईव्ह, वांद्रे, मुंलुंड, भांडुप, अंधेरी या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. इतकंच काय कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांची घरी जाण्यासाठी धाकधूक वाढली आहे. अंधेरीतही गेल्या अर्धा तासापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाला की लगेचच यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. तसेच वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला जात आहे.

रायगड, ठाणे, पालघर आणि पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, भंडारा, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि बुलढाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.