Mumbai : गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, उद्या ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..! सोमवारी भरगच्च कार्यक्रम

मुंबई महापालिकेची निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवाय मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना ही एकाकी पडली असून त्याअनुशंगाने भाजपाच्या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. निवडणूकांपूर्वी अमित शाह यांच्या दौऱ्याला महत्व असते. यंदा तर मुंबई महापालिका हे भाजपाचे प्रमुख मिशन असणार आहे.

Mumbai : गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, उद्या ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..! सोमवारी भरगच्च कार्यक्रम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई विमानतळावर दाखल झाले असता त्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 11:20 PM

मुंबई : देशाचे (Amit Shah) गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यंदाच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. तर (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. रविवारी रत्री 10 वाजता ते मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदी उपस्थित होते. सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे. सोमवारी दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम राहणार तर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते काय कानमंत्र देणार हे देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

सोमवारी दिवसभर असे राहणार कार्यक्रम

अमित शाह हे मुंबईत दाखल झाले असून सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर पोलिस बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10 ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते वांद्रे येथील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. गणरायाचे दर्शन झाल्यानंतर 11 च्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या अनुशंगाने दौऱ्याला महत्व

मुंबई महापालिकेची निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवाय मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना ही एकाकी पडली असून त्याअनुशंगाने भाजपाच्या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. निवडणूकांपूर्वी अमित शाह यांच्या दौऱ्याला महत्व असते. यंदा तर मुंबई महापालिका हे भाजपाचे प्रमुख मिशन असणार आहे. दरम्यान, नवनियुक्त पदाधिकारी आणि त्यानंतर आता होत असलेली मुंबई महापालिका निवडणूक त्यामुळे या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीही हजेरी

भाजपाची कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक वेळा दिल्लीवारी केली आहे. पण आता अमित शाह हेच मुंबईत दाखल झाले असून त्यांचे मार्गदर्शन राज्य सरकारची रणनीती आणि भाजपाची आगामी काळातील वाटचाल या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

दौरा गणरायाच्या दर्शनासाठा चर्चा मात्र राजकीयच

अमित शाह हे दरवर्षी गणेश उत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी मुंबईत दाखल होत असतात. यंदाही ते यानिमित्ताने मुंबईत आले असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय किनारही आहेच. शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर ते राज्याच्या राजधानीत दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र सामोरे जाणार का? मनसेच्या युतीबाबत काय होणार? असे एक ना विषयांनी हा दौरा चर्चेत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.