AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुर्ल्यापासून नालासोपाऱ्यापर्यंत मजुरांच्या रांगाच रांगा; गावाला जाण्यासाठी कुटुंबासह स्टेशन गाठलं

संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी कायम आहे. (Huge Crowd of Workers Gathers at Kurla Railway Station in Mumbai)

कुर्ल्यापासून नालासोपाऱ्यापर्यंत मजुरांच्या रांगाच रांगा; गावाला जाण्यासाठी कुटुंबासह स्टेशन गाठलं
Kurla Railway Station
| Updated on: Apr 16, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई: राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे रोजगारावर परिणामाची भीती निर्माण झाल्याने अनेक मजुरांनी आज संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही गावाला जाण्यासाठी रेल्वे स्थानकं गाठली. कुर्ल्यापासून ते नालासोपाऱ्यापर्यंतच्या जंक्शनवर कुटुंबकबिल्यासह मजुरांनी धाव घेतल्याने या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच स्टेशनमध्ये कुणालाही सर्रासपणे जाऊ देण्यात येत असल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. (Huge Crowd of Workers Gathers at Kurla Railway Station in Mumbai)

नालासोपाऱ्यात तोबा गर्दी

संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी कायम आहे. नालासोपाऱ्याहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खचाखच भरून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. प्रवाशी आणि गावाला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल आणि प्लॅटफॉर्म तुडुंब गर्दी भरलेली असून श्वास घ्यायला ही जागा नसल्याचे चित्र नालासोपारा रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे. स्थानकावर अद्यापही कुणाचीही तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहे. लोकलच्या गर्दीतून कोरोनाचा साखळी तुटणार कशी हा प्रश्न कायम आहे. नालासोपारा रेल्वेस्थानकातून सकाळच्या वेळेत एकामागून एक जाणाऱ्या लोकल तुडुंब भरून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. अगदी सकाळपासूनच नालासोपाऱ्यात मजुरांनी प्रचंड गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत.

एलटीटीवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

मुंबईच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला सतत सातव्या दिवशीही लॉकडाऊनच्या भीतीने गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी प्रचंड गर्दी केली आहे. भागलपूर, पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासून लांबच लांब रांग लावल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याने प्रशासनाचीही गर्दीला आवर घालण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अधिक गर्दी वाढू नये आणि आहे ती गर्दी कमी व्हावी यासाठी स्टेशन परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. तसेच स्टेशनबाहेर बॅरेकेटिंग करण्यात आले असून तिकीट असलेल्यांनाच स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. अनेक मजूर विनातिकीट रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्याने त्यांना परत पाठवलं जात असून प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. (Huge Crowd of Workers Gathers at Kurla Railway Station in Mumbai)

संबंधित बातम्या:

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजारभावाप्रमाणे, मुंबई महापालिका आयुक्तांनी भाजपचे आरोप फेटाळले

‘मॅनेजमेंट गुरु’ म्हणवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ, 5 हजारापैकी फक्त 200 उरले!

Photo : महाराष्ट्र संचारबंदी, मुंबईत कुठे रेल्वे स्थानकांवर गर्दी तर कुठे शुकशुकाट

(Huge Crowd of Workers Gathers at Kurla Railway Station in Mumbai)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट