रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजारभावाप्रमाणे, मुंबई महापालिका आयुक्तांनी भाजपचे आरोप फेटाळले

पालिका आयुक्तांनी विविध महानगरपालिकेने केलेल्या खरेदीची यादीच जाहीर केली आहे. (BMC Commissioner on BJP allegations)

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजारभावाप्रमाणे, मुंबई महापालिका आयुक्तांनी भाजपचे आरोप फेटाळले
iqbal chahal

मुंबई : मुंबई महापालिकेने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खरेदीत भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप भाजपने केले आहे. मात्र मुंबई पालिकाने रेमडेसिव्हीरची खरेदी ही बाजारभावाप्रमाणेच केली आहे, असे स्पष्टीकरण पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहे. पालिका आयुक्तांनी विविध महानगरपालिकेने केलेल्या खरेदीची यादीच जाहीर केली आहे. (Mumbai BMC Commissioner comment on BJP allegations on Remdesivir injection Purchase)

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजाराभावाप्रमाणे

मुंबईतील महानगरपालिकेने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजाराभावाप्रमाणे केली आहे. महापालिकेने प्रत्येक रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे 1 हजार 568 रुपयांना खरेदी केले आहे. तसेच याच दराने देशातील काही महानगरपालिकांसह राज्य सरकारने हे इंजेक्शन खरेदी केले आहे, असा दावा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे. तसेच याबाबतच खरेदीची एक यादीही त्यांनी जारी केली आहे.

भाजपचा आरोप काय?

मुंबई महापालिकेने 1 लाख 568 रुपये या दराने मुंबईकरांसाठी दोन लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी केली होती.  मात्र भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी हाफकीन इन्स्टीट्यूटने 665 रुपये दराने 20 हजार इंजेक्शन खरेदी केल्याचा दावा केला होता. मात्र पालिका तिप्पट दरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी करीत असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अनेक ठिकाणी याच दराने औषधांची खरेदी

याबाबत मुंबईतील महानगरपालिकेने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची खरेदी बाजाराभावाप्रमाणे केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका, सुरत महानगरपालिका, गुजरात मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन, वैद्यकीय शिक्षण आयुक्तालय, मध्य प्रदेश, आसाम राज्य सरकार तसेच सातारा जिल्हा रुग्णालय अशा अनेक ठिकाणी याच दराने औषधांची खरेदी करण्यात आली आहे, असा दावाही आयुक्तांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने या इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी सिप्ला या कंपनीशीही चर्चा केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुरवठा करणं शक्य नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.  (Mumbai BMC Commissioner comment on BJP allegations on Remdesivir injection Purchase)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

Maharashtra Corona Update : राज्यात मृत्यूचं तांडव! दिवसभरात 349 जणांचा मृत्यू, तर 61 हजार 695 नवे रुग्ण

Maharashtra Sanchar Bandi : आता सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली

Published On - 9:40 am, Fri, 16 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI