ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही; सुनील पाटलांनी आरोप फेटाळले

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेले सर्व आरोप सुनील पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ऋषिकेश देशमुखांना मी ओळखत नाही. (i never met hrishikesh deshmukh and nawab malik, says sunil patil)

ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही; सुनील पाटलांनी आरोप फेटाळले
सुनील पाटील
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:43 PM

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेले सर्व आरोप सुनील पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ऋषिकेश देशमुखांना मी ओळखत नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कधीच भेटलो नाही, असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.

सुनील पाटील आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मोहित कंबोज यांनी केलेले. आर्यन खान प्रकरणात मला फसवलं गेलं. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. हवं तर सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा, असं आव्हानच सुनील पाटील यांनी दिलं.

अनिल देशमुखांना एकदाच भेटलो

मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही. ऋषी देशमुख यांना मी ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असं ते म्हणाले.

धुळ्यात जाऊन माझी प्रॉपर्टी तपासा

कंबोज यांनी त्यांच्यावर बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यालाही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. मी जर बदल्यांचं रॅकेट चालवतोय तर माझ्याकडे किमान 100 कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास करा आणि नंतर रॅकेटची वार्ता करा, असं आव्हानच त्यांनी कंबोज यांना दिलं.

मला जीवे मारण्याची धमकी

सध्या मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बोलावलं होतं. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत गेल्यावर पहिल्या दिवशी मला धमकी दिली. मारहाण केली. इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू यांना एक्सपोज कर, असं मला धमकावलं. त्यावर, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू, असं मी त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली; सुनील पाटील यांची धक्कादायक माहिती

मनिष भानुशालीने 1 तारखेला यादी दिली, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं; सुनील पाटील यांचा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर गौप्यस्फोट

‘मी मास्टरमाईंड नाही, समीर वानखेडेंशीही संपर्क नाही’, सुनील पाटील यांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण

(i never met hrishikesh deshmukh and nawab malik, says sunil patil)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.