AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिष भानुशालीने 1 तारखेला यादी दिली, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं; सुनील पाटील यांचा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर गौप्यस्फोट

खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.

मनिष भानुशालीने 1 तारखेला यादी दिली, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं; सुनील पाटील यांचा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर गौप्यस्फोट
SUNIL PATIL
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 5:05 PM
Share

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोजच नवनी स्फोटक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे कथित नेते सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.

मनिष भानुशालीने लिस्ट दिली, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं

“मनिष भानुशालीने जी नावं पाठवली होती, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं. काही तरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने चौकशी करावी. 1 तारखेला मला मनिष भानुषालीने यादी पाठवली होती. ही लिस्ट मला सॅम्युअल डिसूजाला द्यायची होती. पण त्या लिस्टमध्ये आर्यनचं नाव नव्हतं. ही लिस्ट मी पत्रकार आणि एजन्सीला देणार आहे. माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि रेकॉर्डिंगचा पुरावा आहे. लिस्ट व लोकेशन आहे माझ्याकडे,” असं सुनिल पाटील म्हणाले.

या प्रकरणात फसवण्यात आलं, सखोल चौकशी झाली पाहिजे

तसेच पुढे बोलताना, “मी दिलीप वळसे पाटीला यांनी भेटलेलो नाही. अनिल देशमुख यांना फक्त एकदाच भेटलो. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट नाही. मी ट्रान्सफरचे रॅकेट चालवतो, असा आरोप केला जातो. पण तसे काही नाही. मला या प्रकरणात फसवण्यात आले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पोहिजे. मी सह्याद्री येथे कधीही गेलेलो नाही. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी झाली पाहिजे. माझी आणि नवाब मलिक यांची भेट झालेली नाही. मलिक आणि माझं दहा तारखेला बोलणं झालं. मला अडकवण्यात येईल असं मी त्यांना सांगितलं आणि झालंही तसंच, असे सुनिल पाटील म्हणाले.

सुनील पाटील कोण आहेत ?

सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं जातंय. ते मुळचे धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत. सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी ते मुंबईतच राहतात. गुजरात आणि दिल्लीतही त्यांचं वास्तव्य असतं. अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांचा मंत्रालयात सहज वावर असल्याचं सांगितलं जात आहे. एखादं प्रकरण कसं हाताळायचं यात त्यांचा हातखंडा असल्याचं सांगितलं जातं.

सुनिल पाटील यांच्यावर आरोप काय?

मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावा कंबोज यांनी केला. तसेच सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.

इतर बातम्या :

‘नगर जिल्ह्यात लग्न झाल्यावर पाण्यावर भाषणं व्हायची!’ शरद पवारांनी सांगितला किस्सा, बदलत्या परिस्थितीचंही कौतुक

‘राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये’! बाळासाहेब थोरातांची कोटी, उपस्थितांमध्ये खमंग चर्चा

‘शबाब, शराब, कबाब आणि नवाब’वरून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जुंपली, वाचा दावे-प्रतिदावे

(on name of aryan khan in list given by Manish Bhanushali Sunil Patil comment on aryan khan drug case)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.