‘मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाही’, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खरंतर, दक्षिण मुंबईत रात्री एक तरुण रस्त्यावर फिरत होता. त्याने तोंड रुमालाने झाकल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. असा आरोप गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

'मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाही', न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाहीImage Credit source: (Image Google)
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 2:03 PM

मुंबई-  मुंबई – दिल्ली (Mumbai – Delhi) सारखी मोठ मोठी शहरं (Big cities) रात्रंदिवस जागीच असतात. रात्रीच्या कोणत्याही वेळी अगदी मध्य रात्री (Mid Night) सुद्धआ लोक रस्त्यावर दिसतात. पण कधी कधी रात्री उशिरा फिरणाऱ्यांना. कायदेशीर कारवाईलाही (Legal action) सामोरे जावे लागते. अशाच एका प्रकरणात मुंबईच्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय आला आहे.

रात्री उशिरा फिरणे आणि चेहरा लपवणे या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच, न्यायालयाने आपल्या निर्णयात केलेल्या टिप्पणीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणे हा गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रकरण काय होते?

ही घटना दक्षिण मुंबईतील आहे. 13 जून रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी 29 वर्षीय सुमित कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122-ब अंतर्गत या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याल आला. कोणीही गुन्हा करण्याच्या उद्देशाने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान चेहार झाकतो, त्यासाठी हे कलम लागू पडते. त्यानंतर हे प्रकरण गिरगाव दंडाधिकाऱ्य़ांच्या न्यायालयात पोहोचले. तिथे हे प्रकरण पोहचले असता याप्रकरणात पोलिस अपयशी ठरले. त्यानंतर न्यायालयाने 16 जून रोजी निकाल देताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

हे सुद्धा वाचा

आदेशात म्हटले आहे

न्यायदंडधिकाऱ्यांनी  म्हंटलं आहे, मुंबईसारख्या शहरात रात्री दीड ही काही फार उशीराची वेळ नाही. रसत्यावर कोणीही उभे राहू शकते. त्यामुळे त्याने काहीतरी गुन्हा करण्यासाठी चेहरा लपवला हे मानता येणार नाही. रात्री 1.30 ची वेळ खूप उशिर आहे असं जरी गृहीत धरलं तरी, कर्फ्यू लागू नसेल. तर रसत्यावर फिरणे हा गुन्हा नाही. मुंबईत रात्री कर्फ्यू नसल्याने रस्त्यावर उभे रहिल्यास तो गुन्हा ठरत नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.