जिथे ओवैसी सारख्या औलादी आहेत, तिथे सैन्य घुसवा म्हणजे… राज ठाकरे मोदींना नेमकं काय म्हणाले?
महायुतीची प्रचारसभा मुंबईतील शिवाजी पार्कवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. राज ठाकरेंनी यावेळी आपल्या भाषणात देशात एका ठिकाणी सैन्य घुसवण्याची मागणी केली आहे.

महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या. यावेळी मुसलमानांबाबत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष औवेसींचं नाव घेत मोदींकडे एक मागणी केली. राज ठाकरे यांनी नेमकी काय मागणी केली जाणून घ्या.
या देशात देशभक्त मुसलमान आहे. त्यांची देशावर निष्ठा आहेत. काही मूठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना 1o वर्षात डोकंवर काढता आलं नाही. डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहे. त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांना काम करायचे आहे. जे मूठभर आहेत. ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
९०च्या दशकात आपल्या कारसेवकांना ठार मारलं. मुलायम सरकारने ते केलं. बाबरीचा ढाचा पडला. राम मंदिर कधी होईल असं वाटत होतं. मनात आलं हे मंदिर कधी होणार नाही. मोदींना धन्यवाद देतो. तुम्ही होता म्हणून राम मंदिर होऊ शकलं. नाही तर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघतो तेव्हा एक गोष्ट कानावर पडायची. ३७० कलम रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात ती गोष्ट झाली नाही. ती मोदींनी केली. काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जागा घेऊ शकता. तो भारताचा भाग आहे हे आता सिद्ध झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.
राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
