इंडिगो सेल : फक्त 999 रुपयात विमान प्रवास

कमी किमतीत विमान प्रवासाची ऑफर इंडिगो एअरलाईन्सने दिली आहे. इंडिगोने डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी समर सेलची घोषणा केली. 

इंडिगो सेल : फक्त 999 रुपयात विमान प्रवास
Follow us
| Updated on: Jun 11, 2019 | 9:05 PM

मुंबई : कमी किमतीत विमान प्रवासाची ऑफर इंडिगो एअरलाईन्सने दिली आहे. इंडिगोने डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी समर सेलची घोषणा केली.  इंडिगोच्या समर सेलमध्ये डोमेस्टिक तिकिटाची सुरुवात 999 रुपयांपासून सुरु केली आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकिटाची सुरुवात 3 हजार 499 रुपयांपासून केली आहे. ही ऑफर मंगळवार (11 जून) पासून सुरु होत आहे, तर 14 जून पर्यंत ऑफर असणार आहे.

इंडिगो समर सेलमध्ये जर तिकीट बुक केली, तर तुम्हाला 26 जून ते 28 डिसेंबर 2019 च्या दरम्यान प्रवास करावा लागेल. गुरुग्रामच्या एअरलाईन्सने या ऑफरमध्ये जवळपास 10 लाख तिकिटांसाठी विक्री सुरु करणार आहे.

या ऑफरमध्ये इंडिगो इन्डसइन्ड बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला, तर 20 टक्के सूट किंवा 2 हजार रुपये कॅशबॅक ऑफर दिली जाईल. ही कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी न्यूनतम ट्रॅन्जॅक्शन व्हॅल्यू 4 हजार ठेवण्यात आली आहे.

तुम्ही जर आयसीआयसीआय बँक क्रेडिट कंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तिकीट खरेदी केली, तर तुम्हाला 5 टक्के सूट किंवा 1 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला न्यूनतम ट्रॅन्जॅक्शन व्हॅल्यू 6 हजार ठेवण्याता आली आहे. जे ग्राहक तिकीट खरेदीसाठी मोबीक्विक मोबाईल वॉलेटचा वापर करतात त्यांच्यासाठी 15 टक्के सूट म्हणजेच 800 रुपयापर्यंत सूट दिली जाणार आहे.

इंडिगोच्या वेबसाईटवर दिल्ली ते अहमदाबाच्या तिकीटाची सुरुवाती किंमत 1 हजार 799 रुपये आहे. दिल्ली-भुवनेश्वर मार्गासाठी तिकीट किंमत 2 हजार 499 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.