मुखपत्रातून काहीतरी बरळणं हाच उद्योग, चंद्रशेखर बावनकुळे यांचा या नेत्यावर घणाघात

आता शिंदे आणि फडणवीस हे दोन खंदे कार्यकर्ते महाराष्ट्राला भेटलेत.

मुखपत्रातून काहीतरी बरळणं हाच उद्योग, चंद्रशेखर बावनकुळे यांचा या नेत्यावर घणाघात
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: | Updated on: Nov 27, 2022 | 11:03 PM

मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे. ते पुढील वीस वर्षे अशाच पद्धतीने काम करतील. दोनशेहून जास्त विधानसभेच्या जागा जिंकतील, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आता पुढील वीसही वर्षे घरातच बसवून काढावेत. विरोधातच बोलावं हेच त्यांच्या नशिबी आहे. वारंवार आमदार बोलले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा. पण त्यांनी कशी काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण आता भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा विषय संपलेला आहे, असंही त्यांनी स्पष्ट करून सांगितलं.

आता पुढचे सगळे रस्ते आता बंद आहेत. आता शिंदे आणि फडणवीस हे दोन खंदे कार्यकर्ते महाराष्ट्राला भेटलेत. ते 18 – 18 तास काम करतात. महाराष्ट्राला एक नवीन दिशा देतील, असा आशावादही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे काय बोलतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांना रेडे म्हणतात ते आधी त्यांच्याच पक्षात होते ना. मग त्यांना सोडून गेले तर रेडे झाले का. त्यांचा मुख्यमंत्री हा कधी महाराष्ट्रात होणार नाही. त्यांनी फक्त स्वप्न पहावी. प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडणार नाही, असा टोलाही ठाकरे गटाला लगावला.

संजय राऊत यांच्या पेनाची ताकद गेलेली आहे. केवळ शिवराळ भाषेचा वापर करणे, मुखपत्रातून काहीतरी बरळणं राहणं हाच त्यांचा उद्योग आहे. संजय राऊत कधी स्वतःहून निवडणूक लढले का. ते निवडणूक लढली असती, तर त्यांना त्यांची किंमत काय आहे ते कळले असते. त्यामुळे कुणावरही आरोप करताना त्यांनी आधी विचार करावा, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

राज्यपाल यांच्या विधानाशी भाजप कधी सहमत नव्हता. शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यपाल जरी शिवरायांबद्दल बोलले असले तरी त्यांनी किती वेळा शिवरायांचं चरित्र हे आत्मसात केलेला आहे. ते स्वतः शिवनेरीवर चालत गेलेले आहेत, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.