AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar यांना मोठा धक्का, रात्री 12 नंतर Jayant Patil यांनी उचललं मोठं पाऊल!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून रात्री 12 नंतर अजित पवार यांना धक्का देणारी मोठी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली. काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती पाटलांनी दिली.

Ajit Pawar यांना मोठा धक्का, रात्री 12 नंतर Jayant Patil  यांनी उचललं मोठं पाऊल!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 03, 2023 | 12:51 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांविरोधात न्यायालयामध्ये जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून रात्री 12 नंतर अजित पवार यांना धक्का देणारी मोठी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील? 

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी पक्षात जात शपथ घेतली. शरद पवार यांना अंधारात ठेवत ही कृती केली त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, विधानसभेचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर आम्हाला बोलवावं. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत आम्ही माहिती दिली नाही. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही, आम्ही सर्व कायदेशीर पावलं उचलली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या आमदारांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही. आकडेवारीमध्ये आज काही जात नाही कारण बरेच आमदार परत यायचं बोलत आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला अन्याय करायचा नाही. मात्र ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांनी पक्षाला धोका दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

विधानसभा जिंकण्याचा भाजपला विश्वास नसावा त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णयाचा अधिकार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे.  गेलेले आमदार माझे सहकारी नाहीतर कुटुंबातील लोक आहेत, ही घटना मला वेदना देणारी आहे. शरद पवार हीच आमची प्रेरणा असून नव्या उमेदीने संघटना उभी करू. नाती आणि कामात गल्लत नको याची जाणीव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...