AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

चोर काय शक्कल लढवतील याचा कधीच अंदाज बांधता येणार नाही (Juhu police has recovered stolen gold from manhole).

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण
| Updated on: Feb 12, 2021 | 2:47 PM
Share

मुंबई : चोर काय शक्कल लढवतील याचा कधीच अंदाज बांधता येणार नाही. मुंबईच्या जुहू पोलिसांना याचा अनुभव आला आहे. मुंबईच्या जुहू परिसरात एका अल्पवयीन चोराने चक्क मॅनहोलमध्ये चोरी केलेलं 21 लाखांचं सोनं लपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विशेष म्हणजे चोरटा आधी मोबाईल चोरायचा. चोरलेले मोबाईलदेखील तो मॅनहोलद्वारे गटारात लपवायचा. चोरट्याची ही करामत बघून पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत (Juhu police has recovered stolen gold from manhole).

जुहू पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु नगरमध्ये पूजा नावाची महिला वास्तव्यास आहे. पूजा आपल्या परिवारासह महाबळेश्वर येथे फिरायला गेल्या होत्या. महाबळेश्वर फिरुन आल्यानंतर त्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चोरट्यांनी त्यांच्या कपाटातील तब्बल 21 लाखांचं सोनं पळवल्यांचं त्यांच्या लक्षात आलं. या घटनेमुळे पूजा यांच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला.

पूजा यांनी तातडीने जुहू पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती बघितली. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. चोरी झाली त्यावेळी पूजा यांच्या घरात त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य नव्हता. त्यामुळे पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांवर संशय आला. पोलिसांनी आधी याप्रकरणी एफआयआर दाखल केली. त्यानंतर तपासाला सुरुवात केली.

दरम्यान, परिसरातील चोरट्या मुलाने आपल्या मित्रांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने बिअरची ऑर्डर दिली होती. यावेळी पोलीस परिसरात तपास करत होते. पोलिसांना जेव्हा एका मुलाने बिअरची ऑर्डर दिली असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी तातडीने संबंधित मुलाची चौकशी सुरु केली.

संबंधित मुलगा हा इयत्ता नववी नापास असून नोकरीच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. याशिवाय मुलाचे वडील टॅम्पो चालवतात. त्यामुळे हा मुलगा एवढ्या महागड्या बिअरच्या बाटल्यांची कशी ऑर्डर देऊ शकतो? मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याच्याजवळ पैसे कुठून आले? असे प्रश्न पोलिसांना पडले. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं.

पोलिसांनी अल्पवयीन चोरट्याची मुलाची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. याशिवाय परिसरातील मॅनहोलमध्ये उतरुन गटारात सोनं लपवल्याची कबुली त्याने दिली. त्याचबरोबर सोनं चोरण्याआधी तो मोबाईल चोरी करुन तिथेच लपून ठेवायचा, अशीही कबुली त्याने यावेळी दिली (Juhu police has recovered stolen gold from manhole).

हेही वाचा : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.