कतरीना हा बॉलीवूडचे प्रतिनिधीत्व करणारा चेहरा, विकी कौशलने केली बायकोची तारीफ

आपण नेहमीच सांगत आलोय की इंडीयन फिल्म इंडस्ट्री ही काही मोजक्या चेहऱ्यांमुळे जागतिक पातळीवर ओळखली जाते. ती त्यांच्या कामामुळे, कतरीना देखील तिच्या कामाने ओळखली जात असून आपल्याला तिचा अभिमान असल्याचेही कौशल याने एका वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले.

कतरीना हा बॉलीवूडचे प्रतिनिधीत्व करणारा चेहरा, विकी कौशलने केली बायकोची तारीफ
vicky and katrina-kaif
Image Credit source: vicky and katrina-kaif
| Updated on: Dec 21, 2022 | 12:24 PM

मुंबई : कतरीना ही बॉलीवूडचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोजक्या चेहऱ्यांपैकी एक असल्याचे अभिनेता विकी कौशल याने म्हटले आहे. जसे आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरा बनल्या होत्या. जसे बिग बी अमिताभ बॉलिवूडचा चेहरा आहेत, तशीच कतरीना ही देखील बॉलीवूडचा चेहरा बनली असल्याचे विकी कौशल याने म्हटले आहे.

कतरीना आज ज्या ठिकाणी पोहचलेय ती तिच्या कामामुळे आणि मेहनतीमुळे पोहचली आहे. तेथे पोहचणे इतके सोपे नसते. मला तिच्या त्याबद्दल आदर आहे. तिच्या ठिकाणी पोहचायला मला वेळ लागेल. हे चांगले आहे की आम्ही दोघे एकमेकांचा आदर करत असून एकमेकांकडून शिकतही आहोत असे अभिनेता विकी कौशल याने एका मुलाखतीत म्हटले आहे.

डिस्ने हॉटस्टारवर नुकतेच त्याचा गोविंदा नाम मेरा ऑनलाईन रिलीज झाला आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या कॉमेडी थ्रीलरमध्ये कियारा आडवाणी, भूमी पेडणेकर त्याच्यासोबत असून त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

मेघना गुलजार यांच्या आगामी सॅम बहादूर चित्रपटात विकीने फिल्ड मार्शल माणेकशॉ यांची तगडी भूमिका केली आहे. त्यात सान्या मल्होत्रा आणि फातिमा साना यांनी त्याच्या सोबत काम केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षअखेर रिलीज होणार आहे.