मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित

| Updated on: May 06, 2020 | 4:50 PM

केडीएमसीतील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे कर्मचारी असून ते मुंबईला कामाला जाणरे आहेत.

मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित
Follow us on

कल्याण : मुंबईत काम करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना 8 मे (KDMC Corona Update) पासून कल्याण डोंबिवलीत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय स्थगित करण्यात करण्यात आला आहे, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (KDMC Corona Update) यांनी दिली.

मुंबईत काम करणारे सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी दररोज कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला प्रवास करुन जातात. त्यांच्यासाठी बसेस आणि खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. केडीएमसीतील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत कामाला जाणारे कर्मचारी आहेत. ते कल्याण-डोंबिवलीत वास्तव्यास आहेत.

केडीएमसीत एकूण 233 रुग्ण आहेत. यामध्ये 82 रुग्ण हे शासकीय आणि खाजगी कर्मचारी आहेत. तर, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने 28 जणांना (KDMC Corona Update) कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबईतच त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात यावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींसह संस्थांनी केली होती. त्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तूर्तास इतक्या-सगळ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यास बराच वेळ लागणार आहे. जोर्पंयत या कर्मचाऱ्यांची ठोस व्यवस्था होत नाही. तोर्पंयत हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

हा निर्णय चुकीचा : नरेश म्हस्के

कोरोना मुक्त आरोग्य क्षेत्रात, पोलीस क्षेत्रात जी व्यक्ती तसेच अत्यावश्यक सेवेतील जी मंडळी जीव धोक्यात घालून काम करत आहे. अशांना पालिका हद्दीत न येण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो चुकीचा आहे, असं मत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मांडलं. असा निर्णय महापालिकेने घेणे, हा दरी निर्माण करणारा असल्याचे महापौर यांनी सांगितले.

आपल्या हद्दीत राहू नका, असं तडकाफडकी सांगणे, हे चुकीचे आहे. आपल्या जीव धोक्यात टाकून अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईत काम करत आहेत. ते राष्ट्र सेवा करत आहेत. त्यांना असं हद्दीत राहू नका सांगणे म्हणजे एक प्रकारे दरी निर्माण करण्या सारखं आहे. उलट अशा सेवकांचा विशेष आदर राखून त्यांची काळजी घेतली पाहिजे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी घेतलेला निर्णय जाचक असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के (KDMC Corona Update) यांनी मांडलं.

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका रुग्णालयांत खाटा अपुऱ्या

Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

दारु मिळाल्यानंतर आनंद लुटला, खुशी-खुशीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी धुतला