मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची (Mumbai IPS officer corona Positive) लागण झाली आहे.

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 4:20 PM

मुंबई : मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची (Mumbai IPS officer corona Positive) लागण झाली आहे. ड्रायव्हरमुळे आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात 457 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. (Mumbai IPS officer corona Positive) यामध्ये 40 पोलीस अधिकारी आणि 409 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील पोलीस दलात कोरोनाच्या संसर्गात वाढल्याचं चित्र आहे. हा अधिकारी दक्षिण मुंबईत नियुक्त आहे. या अधिकाऱ्याचा ड्रायव्हर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या अधिकाऱ्यास कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. पण त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर आता या अधिकाऱ्यास होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

राज्यातील अनेक पोलिसांना कोरोना कोरोना संकटाशी मुकाबला करताना अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या 40 पोलीस अधिकारी आणि 409 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्दैवाने राज्यातील 4 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका पोलिसाचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात 8 पोलीस अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 35 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

पुण्यात कोरोनामुळे पोलीस दलातील 57 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा काल मृत्यू झाला (Pune Corona Death Update) आहे. या पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. संबंधित पोलीस हे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचा काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांना 50 लाखांचं कवच

‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. ‘कोरोना’ संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली. (Maharashtra Police Grant during fight against Corona)

राज्यातील पोलिस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ

संचारबंदीदरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. राज्यात आज 181 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. याप्रकरणी 661 जणांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात 93 हजार 721 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 18 हजार 466 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात 52 हजार 555 वाहन जप्त करण्यात आले आहेत.

(Mumbai IPS officer corona Positive )

संबंधित बातम्या  

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

‘मातोश्री’बाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोना, 24 तासात 100 पोलिसांना कोरोना

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.