केतकी चितळेच्या घरातून लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हार्डडिस्क जप्त; अडचणीत आणखी वाढ होणार

| Updated on: May 16, 2022 | 7:03 PM

ठाणे युनिट 1 चे गुन्हे शाखा पथक केतकीच्या राहत्या घरात लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी तिचा लॅपटॉप आणि संबंधित असणाऱ्या तिच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही पोलीस ताब्यात घेणार आहेत.

केतकी चितळेच्या घरातून लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हार्डडिस्क जप्त; अडचणीत आणखी वाढ होणार
केतकी चितळेची पोलीस कोठडी वाढवून मागणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागात आता तिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाले आहेत. त्याबरोबरच आता कलंबोलीतील रोडपली येथील ज्या अवोलॉन सोयायटीत केतकी चितळे राहते. त्या घरातील लॅपटॉप (Laptop) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत. यात तिचा लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

केतकी चितळेच्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या शरद पवारांविषयीच्या त्या पोस्टमुळे आता राजकीय वातावरण तापत आहेत. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाल्यानंतर आता केतकीच्या समर्थनाथ आणि विरोधात अशा दोन्हींकडून क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केतकी चितळेच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापल्यानंतर आता पोलिसांकडूनही तिच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.

घरातून वस्तू ताब्यात

ठाणे युनिट 1 चे गुन्हे शाखा पथक केतकीच्या राहत्या घरात लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी तिचा लॅपटॉप आणि संबंधित असणाऱ्या तिच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी पोलिसांकडून लॅपटॉप आणि तीन फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणीच आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

केतकीमुळे सरकारवर हल्लाबोल

केतकी चितळेच्या पोस्टनंतर उशिरानी सदाभाऊ खोत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी तिचे समर्थन केले आहे. तर सदाभाऊ खोत यांच्यानंतर आता तृप्ती देसाईंनीही तिचे समर्थन करुन राज्याची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, आणि सरकारवरही त्यांनी टीका केला आहे. सोसायटीच्या बाहेर कळंबोली गुन्हे शाखा पथक देखील उपस्थित आहे.