Kirit Somaiya Home Video : किरीट सोमय्यांची झेड सुरक्षा वीस मीटर अंतरावर, आणि घराबाहेर लिहिलय ‘भाग सोमय्या भाग’

महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढणारे, आणि सरकारमधील निम्म्यापेक्षा जास्त मंत्री तुरुंगात जाणार म्हणून सांगणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या घरासमोर आता भाग सोमय्या भाग असं लिहिण्यात आले आहे. घराजवळ झेड सुरक्षा असतानाही घरासमोर येऊन हे कुणी लिहून गेलं आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

Kirit Somaiya Home Video : किरीट सोमय्यांची झेड सुरक्षा वीस मीटर अंतरावर, आणि घराबाहेर लिहिलय 'भाग सोमय्या भाग'
किरीट सोमय्यांच्या घरासमोरच भाग सोमय्या भाग असं लिहिलं गेलं आहेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:59 PM

मुंबईः महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे (Mahavikas Aghadi) बाहेर काढणारे, आणि सरकारमधील निम्म्यापेक्षा जास्त मंत्री तुरुंगात जाणार म्हणून सांगणाऱ्या किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या घरासमोर आता भाग सोमय्या भाग असं लिहिण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी घोटाळे (Fraud) बाहेर काढल्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. तरीही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकी वीस मीटरवर असतानाही त्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं ठळक अक्षरात लिहण्यात आले होते, त्यामुळे आता त्यांच्या विरोधात कोण उभा राहिलं आहे हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यांच्या मुलुंड कार्यालयाबाहेर जे भाग सोमय्या सोमय्या असं ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे, ती रस्त्यावरील अक्षरं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हटवण्याचे काम सुरु होते.

घोटाळे बाजांना तुरुंगात डांबणार असं जाहीर वक्तव्य करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधणाऱ्या किरीट सोमय्यांना त्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं कोणी लिहिले हे मात्र सापडले नाही. त्यामुळे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली गेली आहे.

सोमय्यांवर 57 कोटीचा अपहार

किरीट सोमय्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 57 कोटीचा अपहार केल्याचा आरोप केला गेला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच त्यांच्या घरासमोरच आता भाग सोमय्या भाग असं लिहून त्यांना एक प्रकारे डिवचण्याचाच प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या घराबाहेर हे शब्द कोणी लिहून गेले याचा शोध घेतला जात आहे.

सुरक्षा असतानाही हा प्रकार

किरीट सोमय्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली गेली आहे, त्या सुरक्षा व्यवस्थेची चौकी अगदी त्यांच्या कार्यालयापासून अगदी जवळच आहे तरीही किरीट सोमय्यांवर हे कोणी लिहिले गेले आहे याचेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याचा तपास करण्यासाठी आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांवर आता  कुणी निशाणा साधला आहे हे आता पोलीस तपासानंतरच सिद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

रघुनाथ कुचिक प्रकरणात नाट्यमय वळण! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; चित्राताई म्हणाल्या, आनंद वाटला…

INS Vikrant Case : विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

Sunanda Shetty: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा यांना जामीन; 21 लाखांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी दिलासा

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.