Sunanda Shetty: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा यांना जामीन; 21 लाखांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी दिलासा

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 12, 2022 | 4:37 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांना 21 लाख रुपये कर्ज परत न केल्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने सुनंदा यांना जामिन दिला आहे.

Sunanda Shetty: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा यांना जामीन; 21 लाखांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी दिलासा
Shilpa Shetty with mother Sunanda Shetty
Image Credit source: Instagram

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांना 21 लाख रुपये कर्ज परत न केल्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने सुनंदा यांना जामीन दिला आहे. याशिवाय त्यांच्या विरोधातील जामिनपात्र वॉरंटसुद्धा कोर्टाने रद्द केला. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी 21 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र ते कर्ज परत न भरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. याप्रकरणाची सुनावणी आज (मंगळवार) कोर्टात झाली. याआधी महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना फसवणूक प्रकरणात समन्स बजावले होते. शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयात या समन्सला आव्हान दिलं होतं. (Cheating Case)

नेमकं काय आहे प्रकरण?

ऑटोमोबाईल एजन्सीचे मालक पार्शद फिरोज आमरा यांनी आरोप केला होता की त्यांनी कॉर्गिफ्ट्स या शेट्टी कुटुंबातील कंपनीला 21 लाख रुपये कर्ज दिलं होतं. परंतु शिल्पाचे वडील सुरेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना पैसे परत केले गेले नाहीत. आमरा यांच्या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 11 फेब्रुवारी रोजी शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले होते.

शिल्पाच्या वडिलांनी संबंधित ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाकडून 21 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. जानेवारी 2017 पर्यंत त्यांना व्याजासह या कर्जाची परतफेड करायची होती. शिल्पाच्या वडिलांनी वार्षिक 18 टक्के व्याजाने हे कर्ज घेतलं होतं. या कर्जाबद्दलची माहिती त्यांनी मुली आणि पत्नीला दिली होती, असा दावा फिर्यादीने केला होता. मात्र कर्ज फेडण्यापूर्वीच 2016 मध्ये शिल्पाच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शिल्पा, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी कर्ज फेडण्यास नकार दिला, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा:

Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा घेतला निरोप

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI