Kirit Somaiya : राज्यातला वाद पुन्हा दिल्लीत पोहोचणार, सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार

ही शिवसेनेची गुंडगिरी आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना संपण्याचा हा डाव आहे, असा आरोप वारंवार होत आहे. त्यातच आता राज्यातला हा वाद पुन्हा दिल्लीत पोहोचला आहे. कारण भाजप नेते उद्या केंद्रीय गृहसचिवांना (Central Home secretory) भेटण्यासाठी जाणार आहेत.

Kirit Somaiya : राज्यातला वाद पुन्हा दिल्लीत पोहोचणार, सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार
kirit somaiyaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:53 PM

मुंबई : राज्यात पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास (Bjp Vs Shivsena) आघाडी असा जोरदार वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याने राजकारण आणखी तापलं आहे. भाजप नेतेही आता यावरून आक्रमक झाले आहेत. ही शिवसेनेची गुंडगिरी आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना संपण्याचा हा डाव आहे, असा आरोप वारंवार होत आहे. त्यातच आता राज्यातला हा वाद पुन्हा दिल्लीत पोहोचला आहे. कारण भाजप नेते उद्या केंद्रीय गृहसचिवांना (Central Home secretory) भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी ते महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांनी मल्ला संपण्यासाठी पुन्हा माझ्यावर हल्ला केला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर उद्याच्या दिल्ली दौऱ्याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणाही यात उतरण्याची शक्यता आहे.

भाजपच्या शिष्टमंडळात कोण कोण?

भाजप नेते यांनी ट्विट करून याबाबत माहिती देताना, उद्या 10.15 वा. भाजपाचे शिष्टमंडळ आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपा महापालिका नेता विनोद मिश्रा आण मी नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना शिवसेनेचा गुंडांनी मला केलेल्या मारहाण प्रकरण संबंधात कारवाई साठी भेटणार, असे ट्विट केले आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार हे स्पष्ट झाले आहेत.

किरीट सोमय्या यांचं ट्विट

सुधीर मुनगंटीवर यांचाही हल्लाबोल

राज्यातील चालू घडामोडींवर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगाव लागतं असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय..बेईमानाच्या आधारावर जन्माला आलेल ‌सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार असाल तर हे देशातील सर्वात अपवित्र कार्य , हा राजद्रोह परंतु वंदे मातरम , भारत माता की जय न म्हणणारे हे तर मांडीवर बसले पाहिजेत. अशी टीका त्यांनी केली आहे.

Sudhir Mungantiwar : आम्ही बॅक डोअर एन्ट्री करत नाही, राष्ट्रपती राजवटीच्या आरोपावर मुनगंटीवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Amruta Fadnavis : “उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” अमृता फडणवीसांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.