AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची परिस्थिती बिकट, कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती

काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे. (Kumbh return to stay at quarantine compulsorily)

मुंबईची परिस्थिती बिकट, कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती
कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती
| Updated on: Apr 17, 2021 | 3:38 PM
Share

मुंबई : हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले. (Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)

कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवलं जाणार आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.

सर्व सुविधा कमी पडू लागल्यात

मुंबईत परिस्थिती बिकट आहे. आता विनंती करुन झाली आहे. ऑक्सिजनचा तुटव़डा जाणवत आहे. त्यानंतर लगेच त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, हे दृश्य मुंबईकरांनी कधीच पाहिले नाही. आता सर्व सुविधा कमी पडू लागल्या आहेत. मी हात जोडून विनंती करते, कृपया घराबाहेर पडू नका, असेही महापौरांनी सांगितले.

तुम्हाला लॉकडाऊन हवाय का?

मुंबईकरांनो तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबईतील बेडची संख्या 19 हजारावरुन 25 हजार केले आहेत. तर 6 मोठे जम्बो सेंटर उभारले आहेत. मुंबईत जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुंबईत आता अमब्युलन्स आवाज वाढला आहे. तुम्हाला लॉकडाऊन हवाय का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला.

मुंबईतील ताजी आकडेवारी काय?

16 एप्रिल, संध्या 6:00 वाजता

24 तासात बाधित रुग्ण – 8,839

24 तासात बरे झालेले रुग्ण – 9033

बरे झालेले एकूण रुग्ण – 4,63,344

बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%

एकूण सक्रिय रुग्ण-85,226

दुप्पटीचा दर- 43 दिवस

कोविड वाढीचा दर (9 एप्रिल-15 एप्रिल)- 1.6%

(Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?

धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!

Follow Us
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा