कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमधून तर दररोज 15 ते 16 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. (Over 15 -16 lakh passengers travel in Mumbai local, how corona will control?)

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!
MUMBAI LOCAL
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 6:30 PM

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमधून तर दररोज 15 ते 16 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मग कोरोना कसा आटोक्यात येईल? असा सवाल या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लोकल प्रवासावर निर्बंध लादले पाहिजेत, अशी मागणी केली होती. (Over 15 -16 lakh passengers travel in Mumbai local, how corona will control?)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. सध्या 95 टक्के गाड्या चालवण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकल चालवल्या जात आहेत. प्रत्येक पाच मिनिटाला लोकल थांबवून सॅनिटाईज केली जात आहे.

नियमभंग करणाऱ्यावर कारवाई

दरम्यान, राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईननुसार गाड्या चालवण्यात येत आहेत. लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्याही चालवण्यात येत आहेत. गाड्यांमधून मास्कशिवाय प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. रेल्वेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. रेल्वेचा स्टाफ त्यावर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे, असं सांगतानाच राज्य सरकार जसजशी गाईडलाईन जारी करेल, तस तशा गाड्या चालवल्या जातील, असं मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केलं.

प्रवासावर निर्बंध घाला: वडेट्टीवार

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मुंबईत 8 हजार नवे रुग्ण

मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्याही चिंताजनक बनली आहे. दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मुंबई जिल्ह्यातील कोविड वाढीचा दर 1.64 टक्क्यांवर आला आहे. (Over 15 -16 lakh passengers travel in Mumbai local, how corona will control?)

संबंधित बातम्या:

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Over 15 -16 lakh passengers travel in Mumbai local, how corona will control?)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.